‘सेक्स’साठी हा आहे सर्वात अनुकूल ऋतु

पुणे : पाेलीसनामा ऑनलाइन – सेक्सबद्दल लोकांमध्ये अनेक समज गैरसमज असल्याचे पाहायला मिळतात. अनेकजण याबद्दल अनेक वेगवेगळ्या प्रकारे नाॅलेज घेण्याचा प्रयत्न करतात कोणी आपल्या मित्रांना विचारतं तर कोणी इंटरनेटवर सर्च करतं. जेव्हा मित्र माहिती देतात तेव्हा त्यातील अनेक गोष्टी या ऐकीवही असू शकतात. यामुळेच चुकीचे मार्गदर्शन होण्याचे चान्सेस असतात. यामुळे योग्य ती माहिती पोचणे गरजेचे आहे. आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत. तो म्हणजे सेक्ससाठी कोणती वेळ आणि कोणता ऋतु योग्य आहे? अनेकांना याचे उत्तर माहीत नसते. म्हणूनच आज आपण याबद्दल माहिती घेणार आहोत.
सेक्ससाठी हा काळ आणि हा ऋतु आहे योग्य 
सेक्स हा रात्रीच्या वेळेतच करतात हे सर्वांना माहीत आहे. रात्रीच सेक्स करावा असे सांगतानाही कोणाला तुम्ही ऐकले असेल. होय हे खरं आहे की, सेक्स करण्यासाठी रात्रीची वेळच योग्य मानली गेली आहे. परंतु ऋतुबद्दल बहुतांशकरून अनेकांना माहीत नसेल. तसं पाहिलं तर मानव हा तीनही ऋतुमध्ये सेक्स करतो. परंतु त्यातल्या त्यात कोणता योग्य आहे हे  मात्र सांगणे काहींना कठिण जाईल. सेक्स करण्यासाठी हिवाळा आणि वसंत ऋतुची सुरुवात सर्वात योग्य काळ असल्याचे सांगितले गेले आहे. आयुर्वेदामध्येही याबाबत सांगण्यात आले आहे.
कितीवेळा करावा सेक्स ?
सेक्स करण्यासाठी हिवाळा आणि वसंत ऋतुची सुरुवात सर्वात योग्य काळ असला तरी या काळात सेक्स किती वेळा करावा हे मात्र जाणून घेणे गरजेचे आहे. फक्त केव्हा सेक्स करावा हे महत्त्वाचे नाही तर कितीवेळा सेक्स करावा हेही तितकेच महत्त्वाचे आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ऋतुमध्ये  किती वेळा सेक्स करावा हे जाणून घेऊयात.  हिवाळा आणि वसंत ऋतुच्या सुरुवातीच्या काळात शारीरिक अवस्थेप्रमाणे या ऋतुमध्ये आठवड्यातून 3 ते 5 वेळा सेक्स करावा असे आयुर्वेदात सांगण्यात आले आहे. तर याने शरीरात निर्मित होणारे ओजस अर्थात वीर्य वाया जात नसून कामोत्तेजना वाढते असेही समोर आले आहे.
उन्हाळा आणि पावसाळ्यात शारीरिक ऊर्जेत कमी असते यामुळे अशा हवामानात आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा सेक्स केला जावा असंही सांगण्यात आलं आहे.