सावधान ! दिल्लीत आढळला ‘कोरोना’ व्हायरसचा पहिला रूग्ण, बचावासाठी ‘हे’ 10 काम नक्की करा, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – चीनमध्ये पसरलेला कोरोना व्हायरस आता जगभरातील 60 देशांपर्यंत येऊन धडकला आहे. दिल्लीत देखील या जीवघेण्या कोरोना व्हायरसचा एक रुग्ण आढळला आहे. दिल्लीतील एक रुग्ण कोरोना व्हायरसने पीडित आढळला, तो इटलीहून परत भारतात आला होता. तर दुबईतून तेलंगणाला पोहोचलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याची माहिती मिळाली आहे. जगभरात याच व्हायरसने 3000 लोकांचा जीव घेतला आहे, तर 90 हजार लोक कोरोना बाधित झाले. भारतात हा व्हायरस येऊन धडकल्यानंतर आता या व्हायरसपासून बचाव कसा करावा हे माहित असणे आवश्यक झाले आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन (WHO) आणि डॉक्टर्सने या व्हायरसपासून वाचण्यासाठी 10 गोष्टी लक्षात ठेवण्यास सांगितले आहे. या संक्रमणापासून वाचले जाऊ शकते, परंतु एकदा का संक्रमण झाले की जीव वाचवणे अवघड बनते. डॉक्टरांच्या मते, अद्यापही कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी कोणतेही औषध तयार झालेले नाही.

काय आहेत कोरोनाची लक्षण –
कोरोना व्हायरस 2019 ची लक्षण सुरुवातीला सामान्य होते. सुरुवातीला श्वास घेण्यास अडचण येते, खोकला आणि नाक वाहणे ही लक्षणे दिसतात. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की कोरोना व्हायरस संलग्न जे व्हायरस आहेत ते नुकसानकारक नाही. जर कोणी रुग्ण सामान्य कोरोना सारख्या वाटणाऱ्या व्हायरसने बाधित होतो तर तो तीन दिवस किंवा आठवड्यात ठीक होतो परंतु कोरोना व्हायरससंबंधित सहा व्हायरस आहेत, जे जीवघेणे ठरु शकतात. आताचा व्हायरस नोवल कोरोना व्हायरस 2019 या व्हायरसपैकी 7 वा अत्यंत घातक व्हायरस आहे. याच व्हायरसमुळे सार्स (सिवियर एक्यूट रेसपिरेटरी सिंड्रोम) आणि मर्स (मिडल ईस्ट रेसपिरेटरी सिंड्रोम) सारखे आजार पसरतात. आता हा नवा आजार पसरत आहे.

काय आहे सुरुवातीची लक्षणं –
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची सुरुवात तापाने होते, त्यानंतर कोरडा खोकला, श्वास घेण्यात अडचण येऊ लागते. नोवल कोरोना व्हायरस फुफुसाला नुकसान पोहोचवतो. त्यानंतर रुग्णाची प्रकृती आणखी नाजूक होत जाते.

संक्रमण टाळण्याचे आणि वाचण्याचे 10 उपाय –
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन (WHO) ने कोरोना व्हायरसचा प्रभाव असलेल्या लोकांना सूचना दिल्या आहेत, त्यानुसार काही काळजी घेण्यास सांगितली आहे.

1. दिवसातून अनेकदा साबणाने हात धुवा.
2. आपल्या हाताने डोळे, नाक आणि तोंडाला सतत हात लावू नका.
3. तुमचे आणि कुटूंबाचे आरोग्य व्यवस्थित राहतील यांची काळजी घ्या आणि तेच सेवन करा.
4. खोकताना आणि शिंकताना तोंड व्यवस्थित झाका.
5. कोणत्याही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास पाळीव जनावरांच्या संपर्कात येणं टाळा असे ही सांगितले जात आहे.
6. खोकला, ताप आणि सर्दीचे लक्षण असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे तपासणीसाठी जा.
7. श्वसनाचा विकार असलेल्या रुग्णाच्या जवळ जाणे टाळा.
8. कच्चे किंवा अर्ध शिजलेले मांस खाणे टाळा.
9. नियमित स्वच्छता करा.
10. जर ताप किंवा खोकला असेल तर प्रवास टाळा.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी काय करावे –
आरोग्य कर्मचारी स्वत:च संक्रमित होऊ नये यासाठी खबरदारी बाळगा. गाऊन, मास्क, हातमोजे यांच्या वापराशिवाय रुग्णालयात बाधित रुग्णांच्या वावरण्यावर देखील बंधन आणण्याचा सल्ला दिला गेला आहे.