भद्रावती : रेती तस्करावर वन विभागाची कारवाई; ट्रॅक्टर केला जप्त

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन –  येथील वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून रेतीची तस्करी करणा-या ट्रॅक्टरला रंगेहाथ पकडून जप्तीची कारवाई नुकतीच केली.

भद्रावती वन परिक्षेत्रातील मासळ बिटातील कक्ष क्र. २१८,२१९ मधील नाल्यातून रात्री ११.४५ वाजता ट्रॅक्टरद्वारे रेतीची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांना मिळाली. त्यांनी लगेच त्यांचे सहकारी क्षेत्र सहायक एन. व्ही. हनवते, वनरक्षक के. डी. कांबळे, वनमजूर ए. बी. शेळकी यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोहोचताच गणेश वसंता ढेंगळे रा. मांगली हा चालक असलेला ट्रॅक्टर रेतीचा उपसा करताना आढळून आला. चालकाची चौकशी केली असता, त्याने सदर ट्रॅक्टर मांगली येथील रहिवाशी व संजय गांधी निराधार समितीचे भद्रावती तालुका अध्यक्ष प्रशांत काळे यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले.