रेल्वे पुन्हा सुरू करणार ‘ड्रीम प्रोजेक्ट’, ट्रेनमध्ये पुन्हा एकदा ‘लालूंचा जमाना’

भागलपूर : वृत्तसंस्था – रेल्वे स्टेशन आणि रेल्वेमध्ये पुन्हा मटक्यातील चहा (कुल्हड) सुरु होणार आहे. पर्यावरणाचा विचार करून रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षापासून भागलपूर स्थानकात प्लास्टिकऐवजी मटक्यामध्ये चहा उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात, विक्रमशिला एक्स्प्रेसमध्ये हा प्रयोग म्हणून राबविला जाईल. नंतर याची अंमलबजावणी इतर रेल्वे गाड्यांमध्येही केली जाईल.

सन 2004 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी ड्रीम प्रोजेक्ट अंतर्गत ‘मटक्यातील चहा’ योजना राबविली होती. दोन वर्षानंतर ही योजना उदासीनतेमुळे बंद झाली पडली. रेल्वेने पुन्हा एकदा ही योजना आणण्याची तयारी केली आहे.

दररोज 10 हजार कप चहा विकला जातो
सध्या विक्रमशीला एक्स्प्रेस, सूरत एक्सप्रेस, ब्रह्मपुत्र मेल, फरक्का एक्सप्रेस, अंग एक्सप्रेस यांत पेंट्रीकार आहेत. या व्यतिरिक्त जंक्शनवर 10 फूड प्लाझा आहेत. दररोज 10 हजार चहाच्या कपांची विक्री होते. एकट्या विक्रमशिला एक्सप्रेसमध्ये तीन हजारपेक्षा जास्त चहा कपांची विक्री होते.

व्यवसायाला चांगले दिवस येतील
मटक्यातील चहा योजना लागू झाल्यानंतर येथील कुंभार व्यवसायिकांना चांगले दिवस येतील. मातीच्या भांड्यांच्या कमी मागणीमुळे त्यांची आर्थिक स्थितीत कमकुवत आहे. तथापि, ही योजना लागू झाल्यानंतर ही परिस्थिती बर्‍याच अंशी सुधारेल. रेल्वेच्या या निर्णयामुळे स्थानिक कुंभारांना मोठा बाजार मिळू शकेल.

पर्यावरण प्रदूषणावर नियंत्रण
मटक्यातील चहा विकल्यानंतर पर्यावरण प्रदूषणालाही आळा बसेल. यामुळे पेपर आणि प्लास्टिकमधील पेय पदार्थांचे वितरण रोखले जाईल.

70 ते 80 रुपयांमध्ये 100 कुल्हड
अहिल्या देवी म्हणाल्या की, सध्या मटक्यांना जास्त मागणी नाही. शहरातील काही चहाच्या दुकानांत मटक्यांचा पुरवठा केला जातो. 100 मटकी 70 ते 80 रुपयांना विकल्या जातात. सुरेंद्र पंडित यांनी सांगितले की ते 30 वर्षांपासून व्यवसाय करत आहे. मटक्यांना मागणी विशेष नाही. 100 मटकी बनवण्यासाठी आणि भाजण्यासाठी 30 ते 40 रुपयांचा खर्च येतो. मात्र त्याला बाजारभाव मिळत नाही.

नवीन वर्षापासून योजना राबविण्यात येणार
आयआरसीटीसी पूर्व विभागाचे पर्यवेक्षक मनीष कुमार म्हणाले की, मटक्यातील चहा योजना राबविण्याचे आदेश रेल्वे बोर्डाकडून प्राप्त झाले आहेत. यावर विचार चालू आहे. नवीन वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like