Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा; ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीचं ‘Whatsapp chat’ आलं समोर

इंदूर : वृत्तसंस्था – Bhaiyyu Maharaj Suicide Case | आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj) यांच्या आत्महत्येला तीन वर्ष होऊन गेलीत. त्यांच्या आत्महत्या प्रकरणात (Bhaiyyu Maharaj Suicide Case) नवीन खुलासा समोर आला आहे. याप्रकरणी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या व्हॉट्सअप चॅटमुळे (WhatsApp Chat) हा खुलासा समोर आला आहे. भोपाळच्या फॉरन्सिक अधिकाऱ्याने 109 पानाचे व्हॉट्सअप चॅट न्यायालयासमोर (court) सादर केले आहे. यावरुन या प्रकरणाची तपासाची दिशा बदलण्याची शक्यता आहे.

 

जे व्हॉट्सअप चॅट न्यायालयासमोर सादर केले आहे त्यामधून पलक (Palak) आणि पीयूष जीजू (Piyush Jiju) यांच्यातील संवादाचा उल्लेख दिसून येतो. त्यामध्ये मांत्रिकाचा देखील उल्लेख दिसून येतो. या व्हॉट्सअप चॅटमुळे सगळ्याच्यांच भुवया उडाल्या आहेत. दरम्यान, कथित आत्महत्या प्रकरणात पोलिसांवर योग्य तपास करत नसल्याचा देखील आरोप आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पलकचा मोबाईल जप्त केला. यातील व्हॉट्सअप चॅट डेटा रिकवर करण्यात आला. पलकने पीयूष जीजूसोबत भय्यू महाराजांबद्दल बोलल्याचं आढळलं. यात भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी (Dr. Ayushi) आणि मुलगी कुहूचाही (Kuhu) उल्लेख दिसुन येतोय.

 

दरम्यान, पलकनं भय्यू महाराजांचा (Bhaiyyu Maharaj Suicide Case) अश्लिल व्हिडीओ बनवला होता. त्या माध्यमातून ती त्यांना ब्लॅकमेल करत होती. भय्यू महाराज यांनी आयुषीसोबत 2017 मध्ये लग्न केले होते. पलकने 1 वर्षाच्या आत लग्न करण्यासाठी दबाव टाकला होता. पलक 2 वर्षापासून भय्यू महाराजांच्या संपर्कात होती. तिला महाराजांशी लग्न करायचं होतं, पण भय्यू महाराजांनी डॉ. आयुषीसोबत लग्न केले.

 

चॅटमध्ये नेमकं काय आहे?

पलक : आयुषीने मांत्रिकाला पकडलं आहे त्याच्याशी 25 लाखांची डील झालीय

पीयूष जीजू : कोणाशी?

पलक : मांत्रिकाशी

पलक : BM ला वेडं ठरवून घरात बसवायचं आहे

पीयूष जीजू : कुहू घरी येणार आहे. उद्या कुहूची रुम तयार होईल

पलक : कुहूने शरदला सांगितलं आहे. ती समोर आली तर तिला मारुन टाकेन

Palak : आयुषीने येऊन पुन्हा काम खराब केले

पलक : आयुषीने वहिनी आणि कुहूचे फोटो जाळून टाकले

 

भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी गोळी मारुन आत्महत्या (suicide) केली. या प्रकरणात विनायक आणि शरद नावाच्या 2 सहकाऱ्यांना अटक केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, पलकने भय्यू महाराजांचा अश्लिल व्हिडिओ बनवला होता. त्या माध्यमातून ती त्यांना ब्लॅकमेल करत होती. पलक, विनायक आणि शरद हे तिघं महाराजांची संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करत होते. भय्यू महाराज आणि पलक यांचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग सुरु होते. त्यामुळे भय्यू महाराजांवर मानसिक दडपण आल्याचा आरोप आहे.

 

दरम्यान, या व्हॉट्सअप चॅटमधून भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. त्यात काही कोडवर्ड आहेत. म्हणजे (भय्यू महाराजां) BM ला वेडं ठरवून घरात बसवणं. मांत्रिकासोबत 25 लाखांची डील झाली. यावरुन संशय व्यक्त होतोय.

 

Web Title :- Bhaiyyu Maharaj Suicide Case | whatsapp chat girl who blackmailed bhaiyyu maharaj chat come in front bhopal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Modi Government | दरमहिना होईल 1 लाखाची कमाई ! 2 लाख रुपयात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, मोदी सरकार देईल 4 लाख रुपये

Whatsapp Voice Call Recording | ‘व्हॉट्सअ‍ॅप कॉल’ करायचा असेल रेकॉर्ड, तर जाणून घ्या कोणत्या पद्धतीने करू शकता हे काम?

Sarthi Pune | प्रत्येक जिल्ह्यात संगणक आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण देणार – ‘सारथी’चे अध्यक्ष अजित निंबाळकर