‘बाहुबली’मधील ‘भल्लालदेव’ राणा डग्गुबतीनं केली मिहिका बजाजसोबत साखरपुड्याची घोषणा ! सामंथा म्हणाली – ‘मी तर मेलेच आता’

पोलिसनामा ऑनलाइन –भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात मोठा सिनेमा बाहुबली मध्ये भल्लालदेव ही भूमिका साकारणाऱ्या राणा डग्गुबती यानं लॉकडाऊनमध्येच आपल्या साखरपुड्याची घोषणा केली आहे. राणा लवकरच मिहीका बजाज हिच्यासोबत लग्न करणार आहे. राणानं इंस्टावरून साखरपुड्याची घोषणा केली आहे. त्यानं दोघांचाही एक सुंदर फोटो शेअर करत लिहलं की अखेर तिनं होकर दिला आहे.

राणानं आपल्या नात्याची घोषणा करताच सर्वजण त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत. सर्वात आधी त्याची साथी अॅक्ट्रेस सामंथा अक्किनेनी हिनं लिहिलं की, मी तर मेलेच आता. अनिल कपूरनं कमेंट करत लिहिलं की, माझ्या हैद्राबादी मुला शुभेच्छा तुला. मी खूप खुश आहे. उज्ज्वल भविष्यासाठी दोघांनाही शुभेच्छा. याशिवाय कियारा आडवाणी, तमन्ना भाटीया, सुशांत सिंह कृती खरबंदा यांनीही राणाला शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CAFfh1tDzoW/?utm_source=ig_embed

राणाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर मिहिकाच्या आधी राणा आणि अभिनेत्री तृष्णा कृष्णन आणि अनुष्का शेट्टीसोबच्या अफेअरची चर्चा झाली आहे.

कोण आहे मिहिका बजाज ?

एका न्यूज एजन्सीनुसार, मिहिका एक इव्हेंट प्लॅनर आहे. मुबंईतील ड्यु ड्रॉप डिझाईन स्टुडिओची ती मालकीन आहे.

राणाच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर त्याच्या हाथी मेरे साथी या सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली आहे. या पुलकित सम्राटही दिसणार आहे.