Bhangire Pramod alias Nana Vasant | हडपसर मतदार संघातील प्रभाग रचनेवरून शिवसेनेत नाराजी ! माजी नगरसेवक नाना भानगिरे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत मैत्रीपुर्ण लढतीचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bhangire Pramod alias Nana Vasant | महापालिका निवडणुकीसाठीच्या (Pune Municipal Corporation Election 2022) प्रभाग रचनेवरून (PMC final ward structure) पुण्यात महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) अंतर्गत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. विशेषत: हडपसर विधानसभा मतदार संघामध्ये (Hadapsar Vidhan Sabha Constituency) राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) मित्र पक्षाचीच अडचण केली असून प्रसंगी ‘मैत्रीपूर्ण’ लढावे लागले तरी चालेल असा इशारा देत शिवसेनेचे (Shivsena) माजी नगरसेवक नाना भानगिरे (Bhangire Pramod alias Nana Vasant) यांनी नाराजी प्रभाग रचनेवर नाराजी व्यक्त केली आहे. (PMC Election 2022)

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नुकतेच अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका (Maharashtra Local Body Election 2022) एकत्रित लढू असे सूर आळवत असतील तरी स्थानीक पातळीवर मात्र प्रभाग रचनेवरून धुसपूस सुरू झाली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेने या धुसफूशीला तोंड फोडले आहे, तर पर्वती मतदारसंघामध्ये कॉंग्रेसने नाराजीचा ‘बार’ भरला आहे. (Bhangire Pramod alias Nana Vasant)

 

हडपसरमध्ये अंतिम प्रभाग रचना करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेचा विचार न करता स्वपक्षाला साजेशी वॉर्ड रचना करून घेतली आहे. प्रामुख्याने कोंढवा, महमंदवाडी, सय्यदनगर, फुरसुंगी या परिसरात शिवसेनेची चांगली ताकद आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात येणार्‍या हपडसरमधून शिवसेनेचे दोन वेळा आमदार निवडूण आले आहेत. तर आतापर्यंत १० हून अधिक नगरसेवक विजयी झाले आहेत. विशेषत: वरिल परिसरात शिवसेनेचे चांगले प्राबल्य आहे. असे असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आणि आमदार चेतन तुपे यांनी प्रभाग रचना करताना हस्तक्षेप करून प्रभागांची मोडतोड केली आहे, अशी नाराजी माजी नगरसेवक नाना भानगिरे यांच्यासह कोंढव्यातील (Kondhwa) शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. याठिकाणी शिवसेना मजबूत असून प्रसंगी ‘मैत्रीपूर्ण’ लढत देण्याची आमची तयारी असल्याचेही भानगिरे यांनी सांगितले.

कॉंगे्रेसचे माजी गटनेते आबा बागुल (Congress Leader Aba Bagul) यांनी देखिल शिवदर्शन (Shivdarshan Pune)
येथील त्यांच्या प्रभागातील कै. वसंतराव बागुल उद्यानाचे दोन तुकडे करून दोन प्रभागांना जोडले आहेत.
यावर हरकतही घेण्यात आली होती. परंतू तळजाई टेकडी हिरवीगार ठेवणारा ग्रे वॉटर प्रकल्पाचे (Gray Water Project Pune)
क्रेडीट घेण्यासाठी हा भाग सहकारनगर प्रभागाला जोडल्याचा आरोप केला आहे.
आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यासाठीच ग्रे वॉटर प्रकल्प दुसर्‍या प्रभागात टाकण्याचा प्रकार केला
असून जनता अशा वृत्तीच्या लोकांना थारा देणार नाही असा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उल्लेख न करता टोला लगावला आहे.

 

Web Title :- Bhangire Pramod alias Nana Vasant | Shiv Sena displeased over ward formation in Hadapsar constituency! Former corporator Nana Bhangire warns of friendly fight with NCP

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aba Bagul | राजकारणासाठी प्रभाग रचनेत तळजाई टेकडीवरील ‘ग्रे वॉटर प्रक्रिया’ प्रकल्प पळवला, काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल यांचा आरोप

 

Supreme Court On Cheque Bounce Cases | चेक बाउंसप्रकरणी विशेष न्यायालये सुरु करा; महाराष्ट्रासह 5 राज्यांना SC चे निर्देश

 

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार; लग्नाचा आग्रह धरल्यावर फिनेल पाजून केला मारण्याचा प्रयत्न