Bharat Gogawale On MLAs Disqualification | खरे प्रतोद कोण? हा कळीचा मुद्दा ठरला तर? आमदार अपात्रतेसंदर्भात आमदार भरत गोगावले म्हणाले…

मुंबई : Bharat Gogawale On MLAs Disqualification | शिवसेना आमदार (Shivsena MLA) अपात्रतेबाबत आजपासून विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात सुनावणी सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे न्यायालयाच्या निर्देशानुसार ही सुनावणी घेत आहेत. या सुनावणीचा निकाल वेळेत लागला तर तो राज्याच्या राजकीय वाटचालीत अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे मोठी उलथा-पालथ होऊ शकते. या सुनावणीत सर्वाेच्च न्यायालयाने पक्ष प्रतोद (व्हीप) बाबत नोंदवलेले निरीक्षण महत्वाचे ठरणार आहे. (Bharat Gogawale On MLAs Disqualification)

खरे पक्ष प्रतोद कोण?, हा मुद्दा न्यायालयाच्या निरीक्षणामुळे महत्वाचा ठरला आहे. शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) प्रतोद आणि आमदार भरत गोगावले हे सुनावणीला हजर राहण्यासाठी आले असता, याबाबत आज पत्रकारांनी त्यांना विचारले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू हेच प्रतोद म्हणून ग्राह्य धरले जावेत. आजच्या सुनावणीत हा कळीचा मुद्दा ठरेल का? (Bharat Gogawale On MLAs Disqualification)

या प्रश्नावर उत्तर देताना भरत गोगावले म्हणाले, मला असे वाटत नाही. परंतु, हा जर कळीचा मुद्दा ठरला तर आम्ही त्याला सामोरे जाऊ. त्याची काही काळजी करण्याची गरज नाही. आम्ही सुप्रीम कोर्टाचा अवमान करणार नाही. आम्ही विधानसभा अध्यक्षांचाही अवमान करणार नाही. जो काही निर्णय ते घेतील, त्याला आम्ही सामोरे जाऊ. काही काळजी करण्याची गरज नाही.

दोन्ही गटांनी विधानसभा अध्यक्षांना पाठवलेल्या उत्तराबद्दल विचारले असताना आमदार गोगावले म्हणाले, आम्ही सहा हजार पानांचे उत्तर दिले आहे. ठाकरे गटाने पाचशे पानांचे उत्तर दिले आहे. याचा अर्थ आम्ही परिपूर्ण उत्तर दिले आहे. आणि त्यांनी अपूर्ण उत्तर दिले असेल.

गोगावले पुढे म्हणाले, सहा हजार पाने कुठे आणि पाचशे पाने कुठे? फरक आहे ना? त्यामुळे अध्यक्ष देतील तो निकाल आम्हाला मान्य असेल. आजच्या सुनावणीत आम्हीच खरी शिवसेना असल्याचे पुरावे देणार आहोत.
आमच्याकडे पुरावे नसते तर आम्ही या सुनावणीला सामोरे गेलो नसतो.

दोन्ही गटांनी सादर केलेले पुरावे आणि प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करून तसेच दोन्ही गटातील आमदारांची मते ऐकल्यानंतर
राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल देतील.

दरम्यान, शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी निकाल दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने शिवसेनेच्या १६ आमदारांच्या निलंबनाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे.
त्यानुसार विधानसभा अध्यक्ष ही सुनावणी घेत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena MLA Disqualification Case | आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी दोन आठवड्यानंतर, एकमेकांना कागदपत्रे देण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश