Bharat Kalyan | डाएट बदलल्यामुळे साऊथ अभिनेत्याच्या पत्नीचा मृत्यू?

पोलीसनामा ऑनलाईन टीम : दाक्षिणात्य अभिनेता भरत कल्याण (Bharat Kalyan) यांच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर आली. भरत कल्याण (Bharat Kalyan) यांची पत्नी प्रियदर्शनी (Priyadarshini) हिचे आजाराने निधन झाले (Passed-Away) आहे. प्रियदर्शनीने चेन्नईतल्या रुग्णालयात उपचारादरम्यानच शेवटचा श्वास घेतला. प्रियदर्शनी या 43 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असे कुटुंब आहे. प्रियदर्शनी यांच्या मृत्यूचे कारण ऐकल्यावर कोणालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

 

प्रियदर्शनी यांच्या डायट (Diet) मध्ये बदल झाल्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेमध्ये मोठी वाढ झाल्याने, त्या तीन महिन्यापासून आजारी होत्या. जेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक वाटत होती तेव्हा त्यांना चेन्नईतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यानच त्या कोमात गेल्या होत्या. तेव्हापासून ते आज पर्यंत त्या शुद्धीवरच आल्या नव्हत्या. शेवटी 1 नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता त्यांचे निधन झाले.

 

भरत (Bharat Kalyan) यांच्या पत्नीच्या निधनानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
तर भरतच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
भरत कल्याण हा दाक्षिणात्य दिवंगत प्रसिद्ध अभिनेता कल्याण कुमार (Kalyan Kumar) यांचा मुलगा आहे.
भरत कल्याण आजवर अपूर्व रंगल, वंशम आणि जमीला या मालिकेतून घरोघरी पोहोचला आहे.

 

Web Title :- Bharat Kalyan | south actor bharat kalyans wife priyadarshini passed away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Ravi Rana | ‘जर कोणी दम देत असेल तर त्याला…’, रवी राणांच्या वक्तव्यावरुन राणा-कडू यांच्यातील वाद पुन्हा पेटणार

Sambhaji Bhide | संभाजी भिडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाले-‘राम लक्ष्मण एकत्र आले पाहिजेत’

Abdul Sattar | ‘माझ्या मतदारसंघात दोन नंबरचे पप्पू…’, अब्दुल सत्तारांचा आदित्य ठाकरेंना टोला