Bharat Ratna | लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींचा मास्टरस्ट्रोक ! देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव आणि डॉ. एम एस स्वामिनाथन यांना ‘भारतरत्न’

नवी दिल्ली : Bharat Ratna | आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारकडून आणखी एक मास्टरस्ट्रोक मारण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी लालकृष्ण अडवाणी यांना तर बिहारचे सुपुत्र कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली होती. आता मोदींकडून आणखी तीन नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव आणि डॉ एम एस स्वामिनाथन यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे. (Bharat Ratna)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन ही माहिती दिली आहे. मोदी म्हणाले, देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे हे आपल्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेली समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाचा प्रेरणादायी आहे.

पीव्ही नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले की, आपले माजी पंतप्रधान श्री पीव्ही नरसिंह राव गरू यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे हे सांगताना आनंद होत आहे.
एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून, नरसिंह राव गरू यांनी विविध पदांवर भारताची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, तसेच अनेक वर्षे संसद व विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते तितकेच स्मरणात आहेत. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनविण्यात, देशाच्या समृद्धी आणि विकासासाठी भक्कम पाया घालण्यात महत्त्वपूर्ण ठरले.

नरसिंह राव गरू यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात आर्थिक विकासाच्या नवीन युगाला चालना देणाऱ्या
महत्त्वपूर्ण उपाययोजनांनी भारताला जागतिक बाजारपेठ खुली झाली. शिवाय, भारताचे परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान एक नेता म्हणून त्यांचा बहुआयामी वारसा अधोरेखित करते.

डॉ. एम एस स्वामीनाथन यांना ‘भारतरत्न’

भारत सरकार डॉ. एम एस स्वामीनाथन जी यांना आपल्या देशासाठी कृषी आणि शेतकरी कल्याणात दिलेल्या
अतुलनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना भारतरत्न प्रदान करत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली
आणि भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले. एक नवोदित आणि मार्गदर्शक आणि अनेक
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देणारे त्यांचे अमूल्य कार्य आम्ही ओळखतो.
डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने केवळ भारतीय शेतीचाच कायापालट केला नाही तर देशाची अन्न सुरक्षा
आणि समृद्धीही सुनिश्चित केली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Abhishek Ghosalkar | अंगरक्षकाच्या पिस्तुलातून अभिषेकवर गोळीबार ! मेहूल पारेख, रोहित साहू यांना घेतले ताब्यात, आणखी एक पिस्तुल जप्त

FIR On Nikhil Wagle In Pune | पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणारी सराईत गुन्हेगारांची टोळी मुंढवा पोलिसांकडून गजाआड; तलवार, कोयता, लोखंडी रॉड जप्त (Video)

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या विद्यार्थ्यांना 31 संगणकांची भेट