Bharatiya Mazdoor Sangh | असंघटित, कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ रस्त्यावर उतरणार. संघाची पुणे जिल्हा अधिवेशनात घोषणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय मजदूर संघाचे (Bharatiya Mazdoor Sangh) पुणे जिल्हा अधिवेशन (Pune District Convention) शनिवारी (दि. 19) विश्वकर्मा भवन पुणे (Vishwakarma Bhavan Pune) येथे प्रातिनिधिक स्वरूपात पार पडले. या अधिवेशनात असंघटित कामगार (Unorganized Labor), विविध उद्योगातील कंत्राटी कामगार (Contract Worker) यांना रोजगारात सुरक्षितता, जीवन वेतन (Lifetime salary), भविष्य निर्वाह निधी (Provident Fund), ई एस आय (ESI), व पेंशन (Pension) इत्यादी बाबी लागू करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्यास भारतीय मजदूर संघ रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करेल, असा इशारा भारतीय मजदूर संघ (Bharatiya Mazdoor Sangh) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मोहन येणूरे (Mohan Yenure) यांनी दिला आहे.

 

या अधिवेशनाचे उद्घाटन भारतीय मजदूर संघ (Bharatiya Mazdoor Sangh) प्रदेश सरचिटणीस मोहन येणूरे, संघटनमंत्री श्रीपाद कुटासकर, अश्विनी देव, प्रदेश उपाध्यक्ष जालिंदर कांबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष हरि सोवनी, अजेंद्र जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.

 

 

कार्यक्रमचे प्रास्ताविक व गेल्या दोन वर्षांतील कामकाज चा आढावा व ठळक घडामोडीचा वृतांत बाळासाहेब भुजबळ यांनी नमूद केला. यामध्ये कोव्हीड लॉकडाऊन (Covid Lockdown) मध्ये विविध प्रांतातील कामगारांना धान्य वाटप, त्यांच्या मुळ राज्यात परत पाठविण्यासाठी करण्यात आलेली मदत, रोजगार रक्षणासाठी केलेला संघर्ष, वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांची आंदोलन, विविध विषयांवर आलेल्या समस्या सोडविण्यासाठी केलले प्रयत्नांचे निवेदन करण्यात आले.

 

केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकारी (State Government) उद्योगातील (Industries) खाजगीकरण (Privatization), संरक्षण उद्योगातील कंपनीकरण, बँकेचे विलीनीकरण होवू घातलेल्या विधेयकाला विरोध करण्यासाठी 17 नोव्हेंबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या मोर्चा बाबतची माहिती बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) मधील अधिकारी संघटनेचे सरचिटणीस विलास टिकेकर यांनी दिली. कामगार कायद्यातील बदल व सामाजिक सुरक्षा यामुळे उद्योग व कामगार क्षेत्रातील आव्हान, परिणाम या बाबतची माहिती अ‍ॅड. राजेश शाळिग्राम (Adv. Rajesh Shaligram) यांनी दिली.

 

यावेळी अधिवेशनात नवीन कार्यकारिणीची घोषणा संघटनमंत्री श्रीपाद कुटासकर यांनी केली.

भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सरचिटणीस बाळासाहेब भुजबळ, कार्याध्यक्ष अभय वर्तक बँक अजेंद्र जोशी, बँक संघटन मंत्री हरी सोवनी, सहसंघटन मंत्री उमेश विस्वाद, कार्यालय व्यवस्था प्रमुख विवेक ठकार.

 

 

जिल्हा उपाध्यक्ष- प्रवीण निगडे राज्य सरकारी कर्मचारी, बाळासाहेब पाटील महिंद्रा सी आय ई, अण्णा महाजन सेंचुरी ऐन्का,
सुरेश जाधव महावितरण, उमेश आणेराव विज कंत्राटी, बाळासाहेब वरपे खाजगी उद्योग यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
तर सहसचिव म्हणून ज्ञानेश्वर पाटील अ‍ॅम्युनेशन खडकी , विजयेंद्र सावंत ईस्पेस हाय वे, विजय बुधकर शैक्षणिक,
बालाजी ढेरंगे पोस्ट, दत्तात्रय जाधव गोदरेज अ‍ॅड बॉईज, संतोष शितोळे कारगील इंडिया कुरकंभ, विजय चव्हाण बांधकाम कामगार संघ,
राहूल बोडके विज कंत्राटी यांची पुणे जिल्हा सहसचिव म्हणून निवड करण्यात आली.
वंदना कामठे टेलिफोन, व भाग्यश्री बोरकर यांची महिला विभाग प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.

 

 

तसेच या वेळी जिल्हा प्रसिद्ध प्रमुख म्हणून सचिन मेंगाळे व सहप्रसिध्दी प्रमुख गणेश टिंगरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी सचिन मेंगाळे यांची अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ (संलग्न भारतीय मजदूर संघ)
चे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नुकतीच निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
अधिवेशनात पुणे जिल्हातील बॅंक, LIC, संरक्षण, पोस्ट, वीज उद्योग, महानगरपालिका, काँटोंमेंट, बांधकाम कामगार,
घरेलु कामगार, विज कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षक, घरेलु कामगार,
रिक्षा चालक, शैक्षणिक संस्था उद्योगातील कामगार प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते.

 

Web Title :- Bharatiya Mazdoor Sangh | Indian trade unions will take to the streets to demand justice for unorganized, contract workers. Announcement of Sangh in Pune District Convention

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona Update | मोठा दिलासा ! पिंपरी चिंचवडमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या शंभरच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 422 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Orange Peel Benefits | संत्र्याची साल कचरा समजून फेकू नका, असा बनवा चहा आणि चांगले ठेवा संपूर्ण आरोग्य