Bhaskar Jadhav | नारायण राणेंविरोधात अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्या भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल करा, पुणे भाजप युवा मोर्चाचा पुणे पोलिसांकडे तक्रारी अर्ज

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री, भाजप नेते नारायण राणे (BJP Leader Narayan Rane) यांच्याबद्दल अपमानास्पद, शिवराळ तसेच चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात (Kudal Police Station) दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता पुणे भाजप युवा मोर्चाने (Pune BJP Youth Morcha) पुणे पोलिसांकडे (Pune Police) तक्रार अर्ज करुन भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अर्वाच्य व खालच्या पातळीवर टिकाटिप्पणी करुन दोन पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये दंगे घडवून आणू इच्छिणाऱ्या आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर तात्काळ गुन्हा (FIR) दाखल करावा यासाठी पुणे शहर भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुधीर शिंदे (Sudhir Shinde) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) तक्रारी अर्ज केला आहे.

 

तक्रारीत म्हटले आहे की, कुडाळ येथे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांच्यावरील एसीबी कारवाईच्या
विरोधात एसीबी (ACB) कार्यालयावर ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मोर्चा काढला होता.
वैभव नाईक यांच्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीने एसीबीकडून चौकशी सुरु असल्याचे कारण पुढे करुन
18 ऑक्टोबर रोजी सिंधुदूर्ग एसीबी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्यावर अर्वाच्य व खालच्या पातळीवर टिकाटिप्पणी केली.

 

Web Title :- Bhaskar Jadhav | File a case against Bhaskar Jadhav who spoke in Arwach language against Narayan Rane, Pune BJP Yuva Morcha complaint to Pune Police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या ‘या’ 10 मागण्या, ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक

Ajit Pawar  | पुणे महापालिकेत समाविष्ट 34 गावांच्या विकासासाठी तातडीने निधी द्या, अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Jayant Patil | शिंदे गटातील आमदारांना पश्चाताप होत आहे, जयंत पाटलांचा मोठा दावा