Ajit Pawar  | पुणे महापालिकेत समाविष्ट 34 गावांच्या विकासासाठी तातडीने निधी द्या, अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. तसेच या प्रमुख मागणीसह अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकुण 10 मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत. यामध्ये पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) समाविष्ट 34 गावांचा विकास निधी अभावी रखडला असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच तातडीने यासाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रात म्हटले की, पुणे महानगरपालिकेमध्ये मागील पाच वर्षांमध्ये एकूण 34 गावे समाविष्ट झाली आहेत. या गावामध्ये पायाभुत सुविधांची निर्मिती करण्यासाठी नऊ हजार कोटींच्या निधीची मागणी महानगरपालिकेने शासनास केली आहे. महानगरपालिकेत समाविष्ट होऊनही पुरेसा निधी न मिळाल्याने ही गावे पाणी (Water), ड्रेनेज (Drainage), कचरा (Garbage), रस्ते (Road), आरोग्य (Health) अशा मुलभुत सुविधांपासून वंचित राहिले आहेत. यामुळे या गावांमध्ये राहणार्‍या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. तरी या गावांच्या विकासासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन द्यावा.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा
पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील सिध्दार्थनगर, नगररोड, पुणे या ठिकाणच्या नागरिकांची घरे 2009 साली कॉमनवेल्थ खेळासाठी (Commonwealth Games) रस्ता संपादित करुन नागरिकांना झोपडपट्टी पुनर्वसन तसेच पुणे महानगरपालिका आणि जेएनएनयूआरएम (JNNURM) यांनी बाधीत नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येईल असे आश्वासित केले होते. या घटनेला 13 वर्षे होऊनही बाधीत नागरिकांचे पुनर्वसन झाले नाही तरी त्यांचे तातडीने पुनर्वसन करावे.

पत्रात पुढे म्हटले आहे की, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे (Pune-Nashik Semi High Speed Rail)
संदर्भात आपण केंद्रीय रेल्वे मंत्री (Union Minister of Railway) यांच्याशी चर्चा करुन पुणे-नाशिक सेमी
हायस्पीड रेल्वेला केंद्रीय कॅबिनेटची तात्काळ मंजूरीची विनंती केली होती.
मात्र उपमुख्यमंत्री महोदयांच्या दिल्लीतील चर्चेमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री महोदयांचे वेगळे मत आहे.
त्यांनी पुणे-नाशिक रेल्वे इलीवेटेड करुन त्याच्या खालून हायवे करण्याचे प्रस्तावित केले आहे.
तसेच हायस्पीड रेल्वे ही जमिनीवर सुरक्षित नसल्याबाबत मुद्दा उपस्थित केला आहे व प्रकल्पाचा पुन्हा डीपीआर (DPR) करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

या प्रकल्पावर एमआरआयडीसी (MRIDC) व महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) यांनी तीन
वर्षापूर्वीच डीपीआर तयार करुन जमीन संपादनाचे काम बर्‍याच अंशी पूर्ण झाले आहे.
राज्य सरकारने बजेटमध्ये भूसंपादनाची तरतूद केली आहे.
सद्य स्थितीत या प्रकल्पाचे सर्व स्तरावरील रेल्वे अधिकार्‍यांची मंजूरी झाली असून रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांचीही मंजुरी मिळालेली आहे.
केंद्रीय मंत्री मंडळाची मान्यता तात्काळ मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करावा.

Web Title :- Ajit Pawar  | ajit pawar meet cm eknath shinde ask to call for wet drought

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा