Bhaskar Jadhav | पुन्हा जर सिंधुदुर्गात येऊन नारायण राणेंबद्दल बोलला, तर…, निलेश राणे यांचा भास्कर जाधवांना धमकीवजा इशारा

कुडाळ : पोलीसनामा ऑनलाइन – सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यात भाजपने शुक्रवारी संविधान रॅलीचे (BJP Samvidhan Rally) आयोजन केले होते. यावेळी भाषणात भाजपच्या नेत्यांनी वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांच्या विरोधात सुरु असलेल्या लाचलुचपत विभागाच्या (ACB) कारवाईवर भाष्य केले. वैभव नाईकांनी कितीही मोर्चे काढले, तरी त्यांच्या चुकांना हे सरकार माफ करणार नाही, असे भाजप आमदार प्रवीण दरेकर (MLA Pravin Darekar) म्हणाले. तसेच यावेळी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना देखील धारेवर धरण्यात आले. भाजप आमदार निलेश राणेंनी (Nilesh Rane) भास्कर जाधवांना (Bhaskar Jadhav) पाय तोडण्याची धमकी दिली आहे.

 

कुडाळमध्ये काढलेल्या भाजपच्या संविधान रॅलीत भाजप आमदार निलेश राणे (Nilesh Rane), प्रसाद लाड (Prasad Lad) आणि प्रवीण दरेकर (Pravin Darekar) उपस्थित होते. यावेळी तिघांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर टीका केली. भास्कर जाधव जर यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबद्दल काही बोलले, तर ते दोन पायांवर परत जाणार नाही, असा धमकीवजा इशारा निलेश राणेंनी यावेळी दिला. तसेच मी गुहागरला येणार आहे, त्यावेळी मला जे बोलायचे आहे, ते बोलतो, आता जास्त काही बोलत नाही, असे देखील राणे म्हणाले. तसेच भास्कर जाधव यांना निवडणूक लढविण्यासाठी पैश्यांची गरज असताना, नारायण राणेंनी (Narayan Rane) त्यांना मदत केली होती, असेही राणेंनी सांगितले.

प्रसाद लाड यांनी देखील भास्कर जाधवांवर टीका केली आहे . भास्कर जाधव उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) आयटम गर्ल आहे,
असे प्रसाद लाड म्हणाले. प्रवीण दरेकरांनी देखील यावेळी भाषणात वैभव नाईक आणि भास्कर जाधव यांचा उल्लेख करत टोलेबाजी केली.
दरेकर म्हणाले, कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे चुकीला माफी नाही. भास्कर जाधव यांचा राजकीय अंत जवळ आला आहे.
आम्ही चिपळूण गुहागर येथून भास्कर जाधव यांना राजकीय दृष्ट्या संपवणार आहोत. त्या ठिकाणी कमळ फुलणार आहे.

 

Web Title :- Bhaskar Jadhav |  If he comes to Sindhudurga again and talks about Narayan Rane, then…, Nilesh Rane’s warning to Bhaskar Jadhav

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ईडीला कार्टाने झापले! संजय राऊत मीडियाशी बोलतात, तुमच्या का पोटात दुखतंय?

Rain In Maharashtra | मान्सून ‘या’ तारखेला घेणार निरोप, 6 जिल्ह्यांवर अस्मानी संकट

Pune Crime | न्यायालयाने फटकारल्यानंतर हडपसर पोलिसांनी बलात्कार प्रकरणी दाखल केला गुन्हा