Bhau Kadam | विनोदवीर भाऊ कदमने सांगितले तो ‘डाऊन टू अर्थ’ असण्याचे खरे कारण; उत्तराने उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ

पोलीसनामा ऑनलाइन- छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या शो मधून घराघरात पोहचलेला हाडाचा कलाकार म्हणजे भाऊ कदम.(Bhau Kadam) आपल्या अभिनयाच्या वेगळ्या शैलीने आणि विनोदाच्या परफेक्ट टायमिंगमुळे तो खूप प्रसिद्ध झाला आहे. भाऊ कदमचा चाहता वर्ग हा फार मोठा असून त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहे. भाऊने फक्त छोट्या पडद्यावरच नाही तर चित्रपटांमध्येही काम केले आहे. भाऊ कदमचे पांडू (Pandu), नशीबवान (Nashibvaan), जाऊ द्या ना बाळासाहेब (Jau Dya Na Balasaheb) हे चित्रपट गाजले आहेत. एकेकाळी हालाकीचे दिवस काढलेला भाऊ कदम हा आज यशाच्या शिखरावर आहे. या प्रवासात त्यांची एक गोष्ट नाही बदलली ती म्हणजे त्याचं डाऊन टू अर्थ असणं. तो आधीसारखाच कसा राहिला याबाबत भाऊने .(Bhau Kadam) स्वत: खुलासा केला आहे.

अभिनेता भाऊ कदमने सुरुवातीला हालाकीचे दिवस काढले. पानाच्या टपरीवर कामाला असलेल्या भाऊ कदमने आपल्या अभिनय कौशल्यावर प्रसिद्धी, नाव, श्रीमंती सारे काही कमावले आहे. आज त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा भाऊ कदमने नुकताच त्याचा 50 वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. यावेळीचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडिआवर व्हायरल झाला. यामध्ये तो त्याची मुलगी मृण्मयी सोबत दिसत आहे. भाऊची मुलगी मृण्मयी कदम (Mrunmayee Kadam) ही एक युट्यूबर आहे. ती तिच्या चॅनेलवर आणि सोशल मीडियावर फॅशन, मेकअप, लाइफस्टाइलचे व्हिडीओ शेअर करत असते. वडिलांच्या वाढदिवसाचा व्हिडीओ देखील तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये ती भाऊच्या वाढदिवशी कौतुक करत आहे. बाबा किती डाऊन टू अर्थ (Down To Earth) आहेत असे ती या व्लॉगमध्ये सांगत आहे.

मृण्मयीचे हे प्रेमाचे बोल ऐकून भाऊ कदम देखील इमोशनल झाला.
भाऊनं तो डाऊन टू अर्थ का आहे याच एक उत्तर दिलं. त्याचं हे उत्तर ऐकून त्याने तो उत्कृष्ट विनोदवीर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. भाऊ म्हणाला की, “पोर बोलायला लागली ही खूप मोठी गोष्ट आहे. मघापासून सगळे मला डाऊन टू अर्थ आहे असं म्हणत आहेत. असं असण्यामागे कारण. ट्रॉफी घेऊन मी घराच्या दारात येतो. घराची बेल वाजवतो. बायको दार उघडते. मला असं वाटतं की आता सगळे येतील. सगळ्यांना आश्चर्य वाटेल ट्रॉफी बघून. पण ट्रॉफी बाजूला ठेवतात. माझ्या हातात पिशवी देतात आणि जा दूध घेऊन या असं सांगतात. मग मला सांगा मी का नसेल डाऊन टू अर्थ. का मी हवेत उडेन? त्यामुळे असा मी तो डाऊन टू अर्थ आहे”.

भाऊच्या (Bhau Kadam) या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या व्हिडिओवर कमेंट येत असून त्याच्या या हलक्या
फुलक्या अंदाजावर सगळे कमेंट करुन कौतुक करत आहे.

Web Title :  Bhau Kadam | bhau kadam why is down to earth despite so much fame and money

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Actress Asha Parekh | सुप्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना अडकल्यामुळे 16 तास प्यायला पाणी सुद्धा मिळाले नाही ; वाचण्याची नव्हती शक्यता

Actress Ameesha Patel | वॉरंट जारी होताच अभिनेत्री अमिषा पटेलची तोंड झाकून न्यायालयात हजेरी; ‘हे’ आहे प्रकरण

Pune PMC – Katraj Dog Park | नियोजित डॉग पार्कमुळे राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या विस्तारीकरणाला अडथळा?