Bhau Kadam | भाऊ कदमचे झाले आहे ‘लव्ह मॅरेज’; आपल्याच विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला भाऊ, हटके लव्ह स्टोरी

पोलीसनामा ऑनलाइन – मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध विनोदी अभिनेता भाऊ कदम (Bhau Kadam) यांची लोकप्रियता अफाट आहे. झी मराठीवरील (Zee Marathi) प्रसिद्ध ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमुळे (Chala Hawa Yeu Dya Comedy Show) भाऊ कदम यांची घराघरात ओळख निर्माण झाली. त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे भाऊ कदम हे नाव महाराष्ट्रभर गाजू लागले. आता जगभरात भाऊ कदम (Bhau Kadam) यांची सुप्रसिद्ध कॉमेडियन म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या मोठ्या चाहत्या वर्गाला भाऊ कदम हे खऱ्या आयुष्यामध्ये कसे आहेत हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. त्यांच्या अनेक चाहत्यांना हे माहितीच नसेल की भाऊ कदम यांनी लव्ह मॅरेज (Bhau Kadam Love marriage) केले असून त्यांची लव्ह स्टोरी देखील हटके आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कॉमेडियन म्हणून भाऊ कदम (Comedian Bhau Kadam) नावाजले जातात. त्यांचा जगभर चाहता वर्ग असून तगडी फॅन फॉलोविंग आहे. सोशल मीडियावर त्यांना लाखो फॉलोवर्स आहेत. अनेकदा ते आपल्या पत्नी व मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. भाऊ कदम यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी ममता कदम (Mamta Kadam) यांच्यासोबतचा जूना फोटो शेअर केला होता. त्यांच्या या फोटोला चाहत्यांनी अमाप प्रेम दिले. अभिनेता भाऊ कदम यांनी सुप्रसिद्ध ‘कानाला खडा’ या कार्यक्रमामध्ये आपली लव्ह स्टोरी (Bhau Kadam Love Story) शेअर केली होती. अनेकांना भाऊ कदम यांचे लव्ह मॅरेज झाले आहे हे ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या लव्ह स्टोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भाऊ कदम यांच्याकडे शिकवणीसाठी ममता येत होत्या. ममता यांचा दहावीमध्ये एक विषय राहिला होता म्हणून त्या शिकण्यासाठी भाऊ यांच्याकडे येत होत्या. पण भाऊ कदम हे आपल्या विद्यार्थिनीच्याच प्रेमात पडले. त्यांना ममता यांचा स्वभाव आवडला. अनेक वर्षे ते ममताला ओळखत होते. ती त्यांना इतर मुलींप्रमाणे वाटत नव्हती. ममता ही त्यांना गृहिणी असल्याप्रमाणे आणि आपल्याला हवी तशी मुलगी आहे असे वाटत होते.

ममता या शिकवणी सोडून बाहेर गप्पा मारत बसणे किंवा इतरांना बद्दल वाईट बोलणे असे कधीच करत नव्हत्या.
त्यांच्या स्वभावाच्या प्रेमामध्ये पडल्यामुळे भाऊ यांनी ममताला रितसर लग्नासाठी मागणी घातली.
ममता यांनी मात्र विचार करण्यासाठी दोन तीन दिवसांचा अवधी घेतला.
घरच्यांशी या लग्नाबद्दल बोलूनच ममता यांनी भाऊ कदम (Bhau And Mamta Kadam) यांना होकार कळवला.
भाऊ कदम व ममता यांनी घरांच्या संमतीने लग्न केले.
आता ममता आणि भाऊ यांचा सुखी संसार असून त्यांना तीन मुले आहे.
भाऊ कदम (Bhau Kadam) यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.
भाऊ कदम हे अभिमानाने सांगतात की, त्यांच्या मुलांना सांभाळण्यात आणि त्यांच्यावर संस्कार करण्यात ममता
यांचा सिंहाचा वाटा आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | ‘राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते’, सुप्रिया सुळेंचे मोठे विधान (व्हिडीओ)

Chandrashekhar Bawankule | ‘फोडाफोडीचे संस्कार कुणाचे हे देशाला आणि…’, सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर बावनकुळेंचा पलटवार