Bhide Wada Smarak | भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला पुन्हा एकदा ब्रेक? रहिवासी व व्यावसायिकांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bhide Wada Smarak | ऐतिहासिक भिडे वाड्यातील राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. भिडे वाड्यातील रहिवासी आणि व्यवसायिकांनी 16 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलेल्या निकाला विरोधात दाद मागितली असून न्यायालयाने तक्रारदारांचे अपील दाखल करून घेतले आहे. महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) कॅव्हेट दाखल केले असून न्यायालय तक्रारीवर पुढील कोणता निर्णय घेणार यावर स्मारकाबाबत पुढील कार्यवाही अवलंबून राहणार आहे. (Bhide Wada Smarak )

महत्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यामध्ये महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली होती. हा वाडा मोडकळीस आला आहे. या वाड्यात राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी गेली अनेक वर्षे मागणी होत आहे. यासाठी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी वेळोवेळी आंदोलन केले आहे. मात्र या वाड्यातील रहिवासी आणि व्यावसायिकांनी नवीन नियमावली नुसार रोख मोबदला मिळावा यासाठी महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. साधारण 13 वर्षे सुरू असलेल्या या याचिकेवर नुकतेच 16 ऑक्टोबरला उच्च न्यायालयाने निर्णय देताना 2008 मध्ये केलेल्या अवॉर्डनुसार जागेचा मोबदला आणि 2013 च्या कायद्यानुसार वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिल्याने या ठिकाणी पालिकेने बाजी मारली. राजकीय पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यानी याचे जल्लोषात स्वागत केले. भिडे वाड्यासमोर जल्लोष करत या कार्यकर्त्यांनी साखर, पेढे वाटले. यानंतर महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करतानाच भूसंपदानासाठी पुढील कार्यवाही देखील सुरू केली. (Bhide Wada Smarak)

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात रहिवासी आणि व्यावसायिकांनी काल सर्वोच्च न्यायालयात
अपील दाखल केले आहे. न्यायालयाने संध्याकाळी उशिरा अपील दाखल करून घेतले.
यासंदर्भात महापालिकेच्या विधी अधिकारी निशा चव्हाण (PMC Legal Officer Nisha Chavan)
यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या, वाड्यातील रहिवासी आणि व्यावसायिकांनी अपील दाखल केले आहे, याबाबत आम्ही माहिती घेऊन पुढील कार्यवाहीसाठी प्रयत्नशील आहोत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | दिवाळीची खरेदी केलेली बॅग विसरली, फरासखाना पोलिसांनी रिक्षाचा शोध घेऊन परत केली

Maratha Reservation | न्या. शिंदे समितीचा प्राथमिक अहवाल सरकारने स्विकारला, मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ बैठकीत तीन मोठे निर्णय