Bhide Wada Smarak | भिडे वाडा येथे शाळा नाही स्मारक; भूमिपूजन जुलै मध्ये होणार असल्याची अजित पवारांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Bhide Wada Smarak | महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक (Savitribai Phule National Memorial) उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक ती प्रक्रिया करुन गतीने निविदा प्रक्रिया राबवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिले.(Bhide Wada Smarak)

या स्मारकाच्या कामाचे भुमिपुजन जुलैमध्ये होणार आहे. या स्मारकाचा आराखडा तयार केला आहे. या ठिकाणी शाळा होणार नाही. पण तेथे मुलींसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू केले जातील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हे स्मारक पार्किंग तसेच तळमजला अधिक तीन असे चार मजल्यांचे करण्याचा बैठकीत घेण्यात आला. पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, त्यांचा जीवनपट दर्शविणारे म्युरल्स किंवा चित्रमय व्यवस्था, वरील मजल्यावर त्यांच्या जीवनातील प्रसंग, कार्याची माहिती स्क्रीनवर दृकश्राव्य स्वरुपात दर्शविण्याची यंत्रणा तसेच त्यांचे लेखन साहित्य त्याशिवाय वरील मजल्यावर मुली, महिलांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्था अशी व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्री भुजबळ यांनी दिले.

स्मारकासाठीच्या सभोवतालच्या जागेचे भूसंपादनासाठी राज्य शासन आणि महानगरपालिका दोन्ही यंत्रणा रक्कम देणार आहे. स्मारकाचे अंदाजपत्रक तयार करुन निविदा प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने गतीने काम करावे, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.

विधानभवन येथे झालेल्या या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता बांधकाम युवराज देशमुख आदी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Katraj Pune Crime News | पुणे : हॉटेल व्यवसायिकांकडून 5 लाख खंडणी घेणाऱ्या नमस्कार प्रतिष्ठानचा अध्यक्ष निखील शिंदे आणि सिद्धार्थ रणपिसेला अटक

Katraj Pune Crime News | पुणे : हॉटेल व्यवसायिकांकडून 5 लाख खंडणी घेणाऱ्या नमस्कार प्रतिष्ठानचा अध्यक्ष निखील शिंदे आणि सिद्धार्थ रणपिसेला अटक

Alibag – Pune Crime News | अती धाडस तरुणाला जीवावर बेतले, पुण्यातील तरुणाचा अलिबागच्या समुद्रात बुडून मृत्यू

Aundh Pune Crime News | पुणे: लिलावात स्वस्तात गाडी देण्याच्या बहाण्याने साडे 9 लाखांची फसवणूक, दोघांना अटक

Nilesh Lanke-Gajanan Marne | नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात, पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेत स्वीकारला सत्कार (Video)