खुशखबर ! आता ‘BHIM’ अ‍ॅपच्या माध्यमातून होणारे ‘व्यवहार’ झाले ‘स्वस्त’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही BHIM अ‍ॅपचा वापर ऑनलाइन ट्रांन्सफरसाठी करत असाल तर तुम्हाला आता याचा फायदा होणार आहे, कारण UPI च्या माध्यमातून होणारे व्यवहार स्वस्त होणार आहे. BHIM UPI च्या माध्यमातून पैशांच्या व्यवहारावर लागणाऱ्या मर्चेंट डिस्काऊंट रेटमध्ये बदल केले आहेत. NPCI च्या मते, आता 100 रुपयांपर्यंतच्या ट्रांन्जेक्शनवर कोणतेही MDR शुल्क आकारण्यात येणार नाही. यामुळे छोट्या दुकानदारांची मदत होईल. देशातील छोटे व्यवहार BHIM च्या माध्यमातून करण्यावर सरकारचा भर आहे. नवे दर 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.

काय असते एमडीआर शुल्क –
MDR म्हणजेच मर्चेंट डिस्काऊंट रेट. खरेदी करताना ग्राहकांने ऑनलाइन किंवा पीओएसने पेमेंट केल्यास त्यावर दुकानदार काही अतिरिक्त शुल्क आकारतो.
तुम्ही कार्ड पेमेंट केल्यास दुकानदाराला त्यावर काही शुल्क बँकेला द्यावे लागेत. MDR शुल्क दुकानदारांवर लागेत परंतू ते ते शुल्क ग्राहकांकडून वसूल करतात.

नवे MDR दर 1 ऑक्टोबरपासून होणार लागू –
NPCI ने 30 ऑगस्टला केलेल्या घोषणेत सांगितले की, MDR मध्ये बदल करुन जास्तीत जास्त 100 रुपयांच्या प्रति व्यवहाराबरोबर 0.30 % केले आहे. सध्या 2000 रुपयांच्या व्यवहारावर 0.25 % तर 2000 रुपयांपेक्षा जास्तीच्या व्यवहारावर 0.65 % शुल्क आहे.

काय आहे UPI –
यूपीआय म्हणजेच यूनिफाइड पेमेंट इंटरफेस जे डिजिटल वॉलेट्ससारखे नाही. यूपीआय नेट बँकिंगला सोपे बनवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. हे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रांन्सफर करते. हे एक मेल किंवा मेसेज पाठवण्यासारखे आहे. यात तुम्ही तुमचा आयडी तयार करुन शकतात आणि त्या माध्यमातून पैसे ट्रांन्सफर करु शकतात.

आरोग्यविषयक वृत्त –