एल्गार परिषदेमुळेच कोरेगाव-भीमा हिंसाचाराची व्याप्ती वाढली : पुणे पोलीस

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी पार पडलेल्या एल्गार परिषदेच्या चार ते पाच महिने आधी सुरु असलेली पूर्वतयारी आणि एल्गार परिषदेत झालेली भडकावू भाषणांमुळे कोरेगांव – भीमा येथे एक जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी म्हटले आहे. पुणे पोलिसांनी विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात तसे नमूद केले आहे. याप्रकरणी विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयासमोर ५ हजार १६० पानांचे आरोपपत्र तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दाखल केले.
रोना विल्सन, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, सुधीर हे अटक करण्यात आलेले पाचजण आणि भूमिगत असलेले कॉ. एम दीपक ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे, किशनदा ऊर्फ प्रशांत बोस, प्रकाश ऊर्फ नवीन ऊर्फ रितुपन गोस्वामी, कॉ. दिपु, कॉ.मंगलु या दहाजणांच्या विरुद्ध पुणे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रासह ८० साक्षीदारांचे जबाब नोंदवून दाखल केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.

२ लाखांचे लाच प्रकरण : गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हवालदाराला पुण्यात अटक

या प्रकरणातील पाचजणांपैकी रोना विल्सन यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यासंर्दभात पुरावे मिळून आले. सीपीआय -एम या संघटनेचा ईस्टन ब्युरो रिजनल सेक्रेटरी किशनदा ऊर्फ प्रशांत बोस याच्यासोबत रोना विल्सन यांचे ई -मेल द्वारे झालेले संभाषण पोलिसांना तपासात मिळाले. बंदी घालण्यात आलेल्या संघटनेला दारुगोळा आणि शस्त्रसाठा पुरवण्यात मुख्य भूमिका त्याने बजावली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांचा सीपीआय माओवादी संघटनेशी संबंधित विविध कृत्यात सहभाग, नक्षलवादी कारवायांसाठी आर्थिक निधीची तरतूद, भूमिगत नेत्यांसोबत संपर्क करुन शहरी माओवादी कारवायाची अंमलबजावणी केल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे.

शोमा सेन यांनी बेकायदा कृत्य सुरु ठेवले, संदेशांची देवाणघेवाण, बैठकींचे आयोजन यात महत्वाची भूमिका, अनुराधा घंडी मेमोरियल ट्रस्ट मार्फत बेकायदा पध्दतीने गुप्तपणे कारवाया तर महेश राऊत यांच्यावर सीपीआय एम, या संघटनेत नवीन तरुणांची भरती करणे, आर्थिक निधीची उभारणी, पैशांची देवाण-घेवाण, भरती केलेल्या सदस्यांचे दुर्गम भागात प्रशिक्षण असे आरोप आहेत. सुधीर ढवळे यांनी एल्गार परिषदेच्या आयोजनात प्रमुख भूमिका बजावली असून परिषदेच्या आयोजनासाठी निधीची उपलब्ध करणे, माओवादी संघटनेचे ते सक्रिय सदस्य आहेत, असे आरोप आहेत.