धक्कादायक ! युट्यूबवर पाहून ‘त्याने’ रचला ‘फायरिंग’चा बनाव, जाणून घ्या पुढे काय घडले

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन – भिंवडीतील राजनोली नाका परिसरातील स्वीट हॉर्ट या लेडीज ऑर्केस्ट्रा बारच्या मालकावर गोळीबार प्रकरणी इंदौरमधून दोघांना अटक केल्यानंतर या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. बारमलाक अमोल बोऱ्हाडे याने कर्जाचा ससेमीरा चुकविण्यासाठी युट्यूबवर व्हिडीओ पाहून आपल्य़ावरील गोळीबाराचा बनाव रचल्याचे समोर आले आहे.

कपील कथोरे आणि इरफान शेख अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर त्यांच्याकडून गावठी कट्टेही पोलिसांनी जप्त केले आहेत.

काय घडला होता प्रकार
राजनौली परिसरातील स्वीट हार्ट बारचा मालक अमोल बोऱ्हाडे याच्यावर हल्लेखोरांनी बारच्या मागेच सिगरेट ओढत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. त्यावेळी त्याच्या पाठीवर वरील बाजूला गोळी लागली होती. याप्रकरणी कोनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.

असा आला खरा प्रकार समोर
पोलिसांनी तपास केल्यानंतर कपिल कथोरे आणि इरफान शेख यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी गावठी कट्टेही जप्त केले. त्यावेळी त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर अमोल बोऱ्हाडेच आरोपी असल्याचे समोर आले.

यामुळे खरा प्रकार समोर
अमोल बोऱ्हाडे याचे आरोपी कथोरे आणि शेख यांच्याशी फोनवरून बोलणे झाले होते. तो त्यांना गुन्ह्यातून सोडविण्यासाठी मदत करणार असल्याचे बोलत होता. त्यावरून त्याने हा बनाव रचल्याचे समोर आले.

कर्जाच्या फेऱ्यातून सुटका करण्यासाठी बनाव
अमोल बोऱ्हाडे याने व्यवसायातील बऱ्याच ओळखीच्या व्यक्तींकडून ३ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु कर्ज फेडणे शक्य होत नसल्याने त्याच्याकडे लोकांनी रोज तगादा लावला होता. या देणेदारांच्या रोजच्या तगाद्यातून सुटका होण्यासाठी त्याने हा बनाव रचला.

युट्यूब व्हिडीओवरून केला बनाव
अमोल बोऱ्हाडे याने युट्यूबवर एक व्हिडीओ पाहिला होता. त्यात उजव्या पाठीच्या वरील बाजूला गोळी लागली तर व्यक्ती जखमी होतो. परंतु त्याच्या जीवाला धोका नसतो. असं या व्हिडीओत पाहिलं होतं. त्यानंतर त्याने कथोरे आणि शेख यांच्याशी चर्चा करून हा बनाव केला.

You might also like