भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहला मिळाली जिवे मारण्याची धमकी, लखनऊमध्ये दाखल केली FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भोजपुरी चित्रपटांचा सुपरस्टार पवन सिंह बर्‍याचदा चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे आणि दमदार अभिनयामुळे तर कधी स्वतःशी संबंधित काँट्रवर्सिमुळे. नुकताच पवन सिंह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र ही बातमी खळबळ उडविणारी आहे. या भोजपुरी सुपरस्टारला जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ज्यानंतर त्याने लखनऊच्या गोमती नगर पोलिस ठाण्यात काही लोकांविरूद्ध एफआयआर दाखल असून आपला जीव धोक्यात असल्याचे म्हंटले आहे.

पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताच पवन सिंगने सुरक्षेची मागणी केली आहे. तसेच, याप्रकरणी लवकर कारवाई करण्याची विनंती त्याने केली आहे. यावेळी पवनने असेही आरोप केले कि. काही लोक त्याची स्टारडम आणि प्रतिमेवर चिखलफेक करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना त्याची बदनामी करायची आहे, म्ह्णून ते लोक सोशल मीडियावर त्याच्या विरोधात या आक्षेपार्ह पोस्ट टाकत आहेत.

दरम्यान, पवन सिंह सध्या लखनऊमध्ये आपल्या एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पवन सिंहने ‘मेरा भारत महान’ या बिग बजेट चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक शहरांमध्ये या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे. वी प्रांजल फिल्म्स क्रिएशनच्या बॅनरखाली हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सत्यजित राय आणि बिपुल राय यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र तिवारी करत आहेत.