कोरोनाच्या भितीने पतीने पाळले सोशल डिस्टन्सिंग, तर कोर्टात पोहचली पत्नी, द्यावा लागला पुरुषत्वाचा पुरावा

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. कोरोना काळात विवाह झालेल्या तरूणाने पत्नीपासूनच ’सामाजिक अंतर’ राखण्यास सुरूवात केली. यामुळे पत्नी फॅमिली कोर्टात पोहचली आणि घटस्फोट मागू लागली. प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा पत्नीने आपला संशय व्यक्त केला. यानंतर पतीला आपल्या पुरूषत्वाचा पुरावा द्यावा लागला, ज्यानंतर संपूर्ण प्रकरण शांत झाले.

असे आहे संपूर्ण प्रकरण
कोरोना काळात 29 जूनला भोपाळयेथील या तरूणाचा विवाह झाला होता. या काळात त्याच्या सासरकडील अनेक लोक कोरोना संक्रमित झाले होते, ज्यामुळे त्याच्या मनात कोरोनाविषयी भिती बसली होती, आणि त्याने पत्नीपासून सामाजिक अंतर ठेवले. ज्यामुळे त्याने लग्नानंतर दाम्पत्य कर्तव्यसुद्धा पार पाडले नाही. यामुळे पत्नी खुपच भडकली आणि माहेरी निघून गेली.

पत्नीने केला हा आरोप
माहेरी गेल्यानंतर सुमारे 5 महिन्यानंतर 2 डिसेंबरला पत्नीने भोपाळच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. ती म्हणाली माझा पती फोनवर चांगले बोलतो, परंतु कधी माझ्या जवळ येत नाही. यामुळे दोघांमध्ये अनेकदा वाद झाला, परंतु मार्ग निघाला नाही. यामुळे फॅमिली कोर्टाने दोघांचे समुपदेशन केले.

तरूणाला द्यावे लागले पुरुषत्वाचे सर्टिफिकेट
घटस्फोटाच्या अर्जात महिलेने पतीवर नपुंसक असल्याचा आरोप केला. यानंतर समुपदेशनादरम्यान पतीला मेडिकल करण्यास सांगण्यात आले. पतीने मेडिकल करून सर्टिफिकेट कोर्टात जमा केले. ज्यानंतर आढळले की, महिलेचा आरोप चुकीचा आहे. फॅमिली कोर्टाने दोघांना समजावले आणि महिलेला पतीसोबत सासरी पाठवले.