दिग्विजय सिंहांच्या विरोधात ‘पोस्टरबाजी’, मंदिरात प्रवेश बंदीची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस ज्येष्ठ नेता दिग्विजय सिंह यांना विरोधकांनी पुन्हा एकदा निशाण्यावर धरले आहे. भोपाळमध्ये त्यांच्या विरोधात काही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. यात त्यांना मंदिरात प्रवेश न देण्याची मागणी करण्यात आली आहे. दिग्विजय सिंह म्हणाले होते की भगवाधारी मंदिरात रेप करत आहेत. याला प्रतिउत्तर म्हणून ही पोस्टर लावण्यात आले आहेत.

मंगळवारी भोपालमधील संत समागम मध्ये दिग्विजय सिंह भगवावर निशाणा साधला होता. त्यांनी कोणाचे ही नाव न घेता म्हणले होते की भगवाधारी चूर्ण विकत आहेत, मंदिरात रेप करत आहेत. त्यांच्या या वक्तव्याला विरोध करत विरोधकांकडून चांगलेच घेरण्यात आले. बुधवारी रात्री अचानक मंदिराच्या बाहेर पोस्टर लावलेले पाहायला मिळाले. यात दिग्विजय सिंह यांना मंदिरात प्रवेश न देण्याची मागणी करण्यात आली आहे.

या पोस्टवर हिंदू समाज असे लिहिण्यात आले आहे. हनुमान आणि साई मंदिराच्या बाहेरच्या खांबावर हे पोस्टर चिटकवण्यात आले आहेत. दिग्विजय सिंह यांच्या फोटोवर रेट क्रॉस मारण्यात आला आहे. पोलिसांना ही महिती कळताच त्यांनी लगेचच हे पोस्ट काढून टाकले आहेत.

काय बोलले दिग्विजय सिंह
कंम्पुटर बाबांच्या नेतृत्वात भोपळमध्ये मिंटो हॉल येथे संत समागमचे आयोजन करण्यात आले होते. दावा करण्यात येत आहे की यात 1 हजार पेक्षा जास्त साधू संत सहभागी झाले होते. यावेळी दिग्विजय सिंह यांनी भगव्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की साधू संतांचा राजकीय उपयोग केला जात आहे. भगव्याचा दुरुपयोग करण्यात येत आहे. भगावाधारी चूर्ण विकत आहेत, मंदिरात रेप होतात. पुढे बोलताना ते म्हणाले की, अशा लोकांना देव माफ करणार नाही. त्यांनी संतांना आवाहन केले की राजकीय वापरापासून दूर रहा.

Visit – policenama.com