Bhosari Crime | ‘त्या’ खुन प्रकरणात गोल्डनमॅन दत्ता फुगेच्या मुलासह दोघांना अटक, प्रचंड खळबळ

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  दारु पिताना झालेल्या वादातून एका तरुणाने भोसरी (Bhosari Crime) येथील दिवंगत गोल्डनमॅन दत्ता फुगेच्या (Goldman Datta Fuge) मुलाच्या कानाखाली लगावली. तू आमच्या भाईला का मारले, असे म्हणत एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करुन निर्घृण खून (Murder) केल्याची घटना भोसरी (Bhosari Crime) येथे घडली होती. या प्रकरणात गोल्डमॅन दत्ता फुगेच्या मुलासह दोघांना भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

शुभम दत्ता फुगे Shubham Datta Fuge (वय-26 रा. भोसरी), प्रथमेश वायकर Prathamesh Vaikar (वय-19) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एक विधीसंघर्षीत बालकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. अमन सुरेश डांगळे (वय-27 रा. देवकरवस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी सोनाली अमन डांगळे (वय-25) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari police station) फिर्याद दिली.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishna Prakash) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन डांगळे हा रात्री घराबाहेर पडला. भोसरी गावात विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ सोमवारी (दि.26) सकाळी मृतदेह आढळून आला. अमन यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

या प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध घेत असताना गोल्डनमॅन दत्ता फुगे याचा मुलगा शुभम फुगे हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
नुसार पोलिसांनी शुभम फुगे यला ताब्यात घेतले.
त्याचा साथीदार प्रथमेश वायकर व विधीसंघर्षीत बालक यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे शुभमने सांगितले.
त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
आरोप शुभम फुगे याच्या विरोधात यापूर्वी तीन तर विधीसंघर्षीत बालकावर दोन गुन्हे दाखल आहेत.

आमच्या भाईला का मारले…

आरोपी आणि मयत अमन डांगळे हे शुभम फुगे याच्या घराच्या टेरेसवर एकत्र दारु पित बसले होते.
यावळी त्यांच्यात झालेल्या वादातून अमन याने शुभच्या कानाखाली मारली.
तू आमच्या भाईला का मारलं असे म्हणून आरोपींनी डांगळे याला भोसरी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ नेले. त्याठिकाणी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले.
यामध्ये गंभीर जखमी होऊन अमन डांगळे याचा जागीच मृत्यू झाला.

 

Web Title : Bhosari Crime | pimpri-chinchwad police arrest two including goldman datta fuge’s son in murder case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rain in Maharashtra | आगामी 5 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

Tokyo Olympic 2020 | ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याच्या आनंदात महिला अ‍ॅथलीटच्या तोंडातून निघाली ‘शिवी’, पाहा व्हायरल व्हिडीओमध्ये काय म्हणाली ती

Amravati Crime | अमरावतीत ‘हवाला’कांड ! 2 चारचाकी वाहनांमधील 3 कोटी 50 लाखांची रोकड जप्त, 4 गुजराती व्यक्ती ताब्यात