विधानसभेत पुन्हा भुज ‘बळ’

नागपूर:पोलीसनामा ऑनलाईन

सध्या नागपूर येथे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. आज या अधिवेशनाचा दुसरा आठवडा आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवसाची सुरुवात राष्ट्रावादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रवेशाने झाली .आजच्या कामकाजात त्यांनी सहभाग घेतला . तुरुंगातून सुटल्यानंतर तब्ब्ल दोन वर्षांनी भुजबळांचा विधानसभेत प्रवेश झाला. दरम्यान, नागपुरात झालेल्या पावसामुळे विधानसभेचे कामकाज रद्द करण्यात आले होते मात्र आज विधानसभेचे कामकाज पुन्हा चालू करण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B07D18SX5G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7a9d3c52-834f-11e8-bf34-c915f2a928bb’]

याबाबत मिळालेलीच अधिक माहिती अशी की, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कामकाजात भाग घेतला. आज विधानभवनात कामकाज सुरु होण्याआधीच भुजबळांचे आगमन झाले होते. त्यांच्या स्वागतासाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांच्यासह, राष्ट्रवादीचे नेते आमदार उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘कौन आया कौन आया, राष्ट्रवादीका शेर आया ‘ अशा घोषणांनी विधान भवनाचा परिसर दणाणून सोडला.

दरम्यान, काल भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली होती . यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आली होती. यावेळी बोलताना आपण जनतेच्या प्रश्नावर विधानसभेत तर बोलणारच आहोत पण जनतेत जाऊनही सरकारला जाब विचारणार आहोत असा इशारा त्यांनी दिला होता. आता आज विधानसभेत भुजबळ काय बोलणारा याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.