Bhumi Pednekar | अभिनेत्री भूमी पेडणेकरने शेअर केली कथित बॉयफ्रेंडसाठी खास स्टोरी; चर्चांना उधाण

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ही नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. भूमीचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या जीवंत अभिनयावर आणि निखळ सौंदर्यांवर अनेक चाहते घायाळ आहे. आगामी चित्रपटांमुळे चर्चेत असणारी भूमी तिच्या कथित बॉयफ्रेंडमुळे देखील लाईमलाईटमध्ये आली आहे. सध्या तिचे बिल्डर यश कटारिया सोबत अफेअर (Bhumi Pednekar Affair) चालू असल्याच्या चर्चा आहेत. अनेकदा यश व भूमी हे क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतात. मात्र अद्याप त्यांनी त्याचे नाते जाहीर केलेले नाही. नुकताच बिल्डर यश कटारियाचा (Builder Yash Kataria) वाढदिवस झाला, त्याच्या वाढदिवसानिमित्त भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली. त्यामुळे पुन्हा एकदा भूमी पेडणेकर आणि यश कटारिया यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.

अभिनेत्री भूमी पेडणेकर ही सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा ती तिच्या लाईफ अपडेट व फोटोशूट शेअर करत असते. यावेळी तिने तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंड यश कटारियासाठी खास स्टोरी शेअर केली होती. यशचा काल (दि.17) वाढदिवस झाला. यानिमित्ताने भूमीने यश कटारियाचा (Bhumi Pednekar And Yash Kataria) खास फोटो स्टोरीमध्ये शेअर केला. यामध्ये यश रेस्टॉरंटमध्ये केक कट करताना दिसत होता. तसेच तिने “ओजी किंगला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” असे लिहिले होते. च भूमीने यशला इंस्टाग्रामवर टॅग देखील केले होते. आणि सोबतच एक रेड हार्ट देखील होता. अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या या स्टोरीमुळे पुन्हा एकदा ती बिल्डर यश कटारियाला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. अनेक दिवसांपासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत.

अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि यश कटारियाचा सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा आडवाणी (Siddharth Malhotra And Kiara Advani) यांच्या रिसेप्शन पार्टीमध्ये किस करतानाचा व्हिडिओ (Bhumi Pednekar Kissing Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने आपल्या नात्याची कबुली दिली नसून ती सध्या आगामी चित्रपटांवर काम करत आहे. लवकरच ती ‘थॅंक्यू’ या चित्रपटामध्ये (Thank You Movie) झळकणार आहे. तसेच तिचे लेडी किलर (Lady killer), मेरी पटनाचा रिमेक आणि भक्त (Bhakta) हे चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RBI UDGAM Portal | बॅंकेमध्ये दावा न केलेली रक्कम आता एकाच वेबसाईटवर पाहता येणार; आरबीआयने केले खास पोर्टल लॉन्च

Pune Crime News | अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या 4 जणांना गुन्हे शाखेकडून अटक; 46 लाखांचे एम.डी., कोकेन, चरस जप्त (Video)