Bhusaval-Daund Train | भुसावळ-दौंड मेमू साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bhusaval- Daund Train | भुसावळ-दौड-भुसावळ मेमू साप्ताहिक विशेष ट्रेनची (Bhusaval- Daund Train) मुदत वाढवण्यात आली आहे. ही विशेष गाडी 4 नोव्हेंबर पर्यंत चालवण्यात येणार होती. मात्र, आता हि विशेष ट्रेन पुढील आदेश येईपर्यंत सुरु राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच या गाडीच्या संरचना, वेळ आणि थांबे इत्यादींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

01135 / 01136 भुसावळ -दौंड- भुसावळ मेमू साप्ताहिक विशेष गुरुवार (दि.4) पर्यंत चालणार आहे, आता हि विशेष ट्रेन पुढील सुचनेपर्यंत (Bhusaval- Daund Train ) वाढविण्यात आली आहे. मेमू साप्ताहिक विशेष ट्रेनच्या संरचना, वेळ आणि थांबे इत्यादींमध्ये कोणताही बदल करण्यात आले नाहीत. (Bhusaval-Daund Train)

आरक्षण : सर्व संगणकीकृत आरक्षण (Reservation) केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर 01135 / 01136 विशेष ट्रेनच्या विस्तारित फेऱ्यांसाठी सामान्य शुल्कासह बुकिंग सुरू झाले आहे.

वरील विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा असे आवाहन करण्यात आले आहे.
या विशेष ट्रेनमध्ये फक्त कन्फर्म तिकीट (Confirm ticket) असलेल्या प्रवाशांना बोर्डिंग,
प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-19 शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून चढण्याची परवानगी दिली जाणार आहे.(Bhusaval-Daund Train)

 

Web Title :- Bhusaval-Daund Train | Bhusawal-Daund Memu weekly special trains extended; Big decision of railway administration

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

WhatsApp Facebook Meta | बदलले WhatsApp चे डिझाईन, आता दिसू लागले Facebook चे नवीन नाव Meta

Pandharpur Crime | पंढरपूर हादरलं ! 13 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, 3 आरोपींना इंदापूरमधून अटक

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 44 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी