टीम इंडियाला मोठा झटका, ‘हा’ स्टार गोलंदाज २ ते ३ मॅच खेळू शकणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला आणखी एक झटका बसला आहे. सलामी फलंदाज शिखर धवन याच्यानंतर आता वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा दुखापतग्रस्त झाला आहे. काल पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने ८९ धावांनी मात करत शानदार विजय मिळवला. मात्र सामन्यादरम्यान पायाचे स्नायू दुखावलं गेल्याने भुवनेश्वर कुमार या सामन्यात गोलंदाजी करू शकला नाही. त्याने या सामन्यात केवळ २ षटक गोलंदाजी केली.

याआधीही सलामी फलंदाज शिखर धवन जखमी झाल्याने भारतीय संघाची चिंता वाढली असताना आता पुन्हा भुवनेश्वर कुमार जखमी झाल्याने भारतीय संघासाठी ही धोक्याची घंटा आहे. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या सामन्यांमध्ये भुवनेश्वर खेळू शकणार नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर ३० जून रोजी होणाऱ्या यजमान इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात तो पुनरागमन करेल अशी कर्णधार विराट कोहली याला अपेक्षा आहे.

दरम्यान, काल झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानसमोर ३३६ धावांचे लक्ष ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ फक्त २१२ धावाच करू शकला. भारताकडून रोहित शर्मा याने शानदार शतकी खेळी करत १४४ धावा केल्या.

आरोग्यविषयक वृत्त –

रक्तदानामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य राहते चांगले

लठ्ठपणामुळे लहान मुलही होऊ शकतात उच्च रक्तदाबाचे ‘बळी’

गर्भवती महिलांना हे संकेत मिळाले तर त्यांची प्रसूती कधीही होऊ शकते.

हे पदार्थ खा राहाल कायम ‘हेल्दी’