बिबवेवाडी परिसरात कोयत्याने दहशत निर्माण करणारा अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हातात कोयता घेऊन दहशत पसरविणाऱ्या तडीपार गुंडाला बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.

तडीपार सराईत गुन्हेगार ऋषिकेश उर्फ सनी अनिल शिंदे असे गुंडाचे नाव आहे. तो तडीपारीच्या काळातही पुण्यात फिरत होता.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथक गस्त घालत होते. त्यावेळी करत असताना. पोलीस शिपाई चव्हाण यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, बिबवेवाडी पोलीस ठाण्याचा रेकॉर्डवरील तडीपार सराईत गुन्हेगार ऋषिकेश अनिल शिंदे हा अंबामाता मंदिर समोर, सुखसागरनगर, बिबवेवाडी येथे फिरत आहे.

त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध सुरु केला. माहितीनुसार पोलीस गेले तेव्हा ऋषिकेश शिंदे हा हातामध्ये लोखंडी कोयता घेऊन परिसरात दहशत पसरवत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करून थोड्याच अंतरावर ताब्यात घेऊन त्याला

ही कारवाई बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, पोलीस शिपाई चव्हाण, शेंडगे, शिंदे यांनी केली.

आरोग्य विषयक वृत्त –

ठाण्यातील ६६ वर्षीय ब्रेनडेड महिलेचे अवयवदान

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like