मोठी कारवाई ! वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 8 पोलीस तडकाफडकी निलंबित, राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्रसिंग गौड यांच्यासह पोलीस ठाण्यातील 8 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन ( police suspended ) करण्यात आले आहे. अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून हे निलंबन ( police suspended ) झाले आहे. आरोपींवर तात्काळ कारवाई न करता त्यांना हॉटेलात ठेवले व कारवाईला वेळ घालवला असा ठपका ठेवत त्यांचे निलंबन केले आहे. या कारवाईने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिस निरीक्षक सुरेंद्र गौड, पोलीस शिपाई संतोष विष्णू लाखे, माधव मारुती झेंडे, गणेश अशोक शिंदे, श्रीकांत मार्केंडय बोनाकृती, गंगाधर केशाव, अशोक अकबर गायकवाड आणि कैलास प्रकाश जाधव पोलिस दलातून निलंबन झालेल्याची नावे आहेत.

पुणे लोहमार्गच्या पुणे रेल्वे पोलिसांनी 2020 मध्ये अमली पदार्थाचे मोठे रॅकेट पकडले होते.
या प्रकरणी दोघा जणांना पकडले होते.
थर्टी फस्टच्या आयोजित पार्ट्याना हे अमली पदार्थ पुरवले जाणार होते, असे त्यावेळी सांगितले जात होते.
यात 1 कोटी 3 लाख रूपयांचा चरस पकडला गेला होता.
हिमाचल प्रदेश येथून हे चरस आणले जात होते.
डिसेंबर 2020 ला ही कारवाई झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र, कालांतराने हा गुन्हा तपासासाठी एटीएसकडे वर्ग करण्यात आला. त्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना एटीएसला या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल न करता विलंब केला. अंमली पदार्थांसह ताब्यात घेतलेल्या आरोपींवर तत्काळ कारवाई न करता त्यांना काही दिवस पुणे रेल्वे स्टेशन जवळील हॉटेलमध्ये ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. एटीएसने आरोपींचा ताबा घेत चौकशी सुरू केली. त्यात जबाब घेण्यात आला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पोलीस निरीक्षक गौड कायम रेल्वे पोलीस दलात वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. काही प्रवाशांना तपास आणि चौकशीच्या नावाखाली अडवून लुटले जात असल्याचे तक्रारी करण्यात आल्या होत्या. नुकतीच एका राजकीय पक्षाने देखील याबाबत आवाज उठवत तक्रार केली होती.

READ ALSO THIS :

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

Maharashtra Unlock News : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात सोमवारपासून ‘अनलॉक’, नियमावली जाहीर; 5 टप्प्यात होणार अंमलबजावणी, जाणून घ्या

तणाव आणि चिंतेमध्ये जगत असाल, तर दररोजच्या नित्यकर्मामध्ये ‘हे’ 3 व्यायाम सामील करा