दौंडमध्ये पोलिस अधीक्षकांच्या पथकाची वाळूमाफियांवर मोठी कारवाई ; ७५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंड मध्ये वाळू माफियांवर अप्पर पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या पथकाने कारवाई केली आहे. यामध्ये तब्बल ७५ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आत्तापर्यंतची हि सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतिल सोनवडी अवैध वाळू उपसा अड्ड्यावर छापे घालुन वाळू चोरी करणारे एकुण १७ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून ०७ आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून त्याच्या कडून ५ ट्रक, २ जेसीबी मशीन, ३ ट्रॅक्टर, ३ ट्रॉली आणि २६ ब्रास वाळू असा एकुण रु ७७,५५००० हजार चा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी ही अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली दौड पो स्टे. चे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस संदीप जाधव, दशरथ कोळेकर, स्वनिल अहिवळे,विशाल जावळे, शर्मा पवार, रॉकी देवकाते, जलद कृती दलाचे 9 जवान आणि दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक खरात, पोलीस जवान धनाजी गाढवे, गवळी, झाडबुके यांनी केली आहे.