‘बिग बी’ अमिताभच्या जंजीर सिनेमाला 47 वर्षे पूर्ण, ‘अँग्री यंग मॅन’नं शेअर केला ‘शेर खान’सोबतचा खास फोटो !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या नायक ते महनायक बनण्याची पहिली शिडी होत ती म्हणजे प्रकाश मेहरा यांचा सिनेमा जंजीर. याआधी अमिताभ यांनी अनेक सिनेमात काम केलं. परंतु एकतर सिनेमा फ्लॉप होत होता किंवा मग हिट जरी झाला तरी अमिताभ लिड अॅक्टर नसायचे. जंजीर हा अमिताभ बच्चन यांच्या करिअरमधील पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा मानला जातो.

या सिनेमानं अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन म्हणून ओळख दिली आणि यानंतर तो एकेक करून यशाची शिडी चढू लागला. सिनेमा 47 वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात बिग बींनी एक पोस्टर शेअर केलं आहे.

अमिताभनं इंस्टावरून सिनेमातील एक तगडं पोस्ट शेअर केलं आहे. पोस्टरमध्ये ते अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत दिसत आहेत. यात शेरखानचा रोल प्ले करणारे अभिनेते प्राणही दिसत आहेत. या सिनेमात प्राण यांनी आपली विलनची इमेज तोडली होती. त्यांचं यारी है इमान मेरा हे गाणं खूप गाजलं होतं. यानंतर प्राण यांच्या करिअरलाही एक वेगळं वळण मिळालं होतं.

वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा होता जंजीर

जंजीर सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर 1973 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमत अमिताभ आणि जया बच्चन प्रमुख भूमिकेत होते. याशिवाय यात प्राण, ओम प्रकाश, इफ्तेकार, सत्येंद्र कपूर, बिंदू आणि केष्टे मुखर्जी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा सिनेमा त्या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. सिनेमातील गाणीही खूप गाजली होती.