बिग बॉसच्या १२’ व्या सिझनमध्ये ही  मराठमोळी अभिनेत्री झळकणार 

मुंबई : वृत्तसंसथा

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय  रिअॅलिटी शो ‘बिग बॉसचे १२  सिझन लवकरच सुरू होणार आहे. कायम चर्चेत असणाऱ्या बिग बॉसच्या १२ व्या शोच प्लॅटफॉर्म बदलण्यात आलं आहे .बिग बॉस १२ व्या सीझनच लाँचिंग लोणावळ्याऐवजी आता गोव्यात होणार आहे . सगळ्यात वादग्रस्त शो म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शोमध्ये प्रत्येक सिझनला कोणते सेलिब्रेटी या घरात एंट्री घेणार याचीही उत्सुकता पाहायला मिळते. सीझन १२ साठी यात एकुण १९ स्पर्धक सेलिब्रेटींची नावे समोर आली आहेत. १६ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या छोट्या पडद्यावरील बिग बॉस सीझन १२ मध्ये मराठी आणि हिंदी सिनेमा ,मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे एन्ट्री करणार आहे .

आता व्हॉट्सअॅप स्टेट्स वरील व्हिडीओ करता येणार डाउनलोड

‘ मे आय कॉम इन मॅडम’ या मालिकेतील  संजनाच्या भूमिकेमुळे  घराघरात पोहचलेली नेहा पेंडसे आता बिग बॉस मध्ये काय धुमाकूळ घालतेय , हे पाहणे औसुक्याच ठरणार आहे. आपला अभिनय , हॉट अंदाजातील फोटोंमुळं नेहा पेंडसे नेहमीच चर्चेत असते .तिच्या याच लोकप्रियतेमुळे तिला या शोमध्ये घेण्यात आलं आहे .  तसेच या सिझनमध्ये देवोलिना भट्टाचार्य, सृष्टी रोडे, विभा छिब्बर,रिद्धीमा पंडीत,मिलिंद सोमण पत्नी अंकिता कुंवर,दिव्या अगरवाल,स्कारलेट मीरोज,शुभी जोशी,शालीन भनोट,शोएब-दिपिका,गुरमीत-देबीना,पम्मी आंटी फेम सुमेर एस परिछा, महिका शर्मा बॉयफ्रेंड डेनी डी,परम सिंह यांची स्पर्धक म्हणून एंट्री होणार आहे. यावेळी हा सिझन थोडा हटके असणार आहे , कारण यावेळी लाँचिंग हे लोणावळ्यात नाहीतर गोव्यात होणार आहे तसेच छोट्या पडद्यावरील गोपी बहु ते छोटी बहुपर्यंत  सहभागी होणार आहेत .

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d6ae9898-adc1-11e8-bc7e-41c8c1d69543′]