मोठया ब्रॅन्डचं दूध देखील आरोग्यासाठी सुरक्षित नाही : सरकारी एजन्सी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कच्चे दूधच नाही तर मोठं मोठ्या ब्रॅंडचे दूधाची गुणवत्ता आणि सुरक्षाच्या मानकांवर उतरत नाही. ही बाब भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSI) एका संशोधनात समोर आली. एफएसएसआय देशातील खाद्य पदार्थांची गुणवत्ता निश्चित करणारी सर्वोत मोठी नियामक सरकारी कंपनी आहे.

दूधातील भेसळीपेक्षा आधिक गंभीर मुद्दा आहे त्याचे प्रदूषण –
शुक्रवारी संशोधनाच्या रिपोर्ट सादर करत एफएसएसआयचे सीईओ पवन अग्रवाल म्हणाले की दूधात भेसळीची समस्या तर आहेत परंतू त्यापेक्षा गंभीर मुद्दा आहे तो दूधातील प्रदूषणचा. नियामकांच्या अभ्यासात सांगण्यात आले की दूधात एफ्लाटोक्सिन – एम 1, अँटीबायोटिक्स आणि किटकनाशकांसारखे पदार्थ आढळून आले, ज्याचे प्रमाण दूधात जास्त होते.

1 जानेवारी 2020 पर्यंत परिक्षण आणि निरीक्षण प्रणाली स्थापित करण्याचा आदेश –
ते म्हणाले की नियामकाने संघटित डेअरी उद्योगांना गुणवत्ता मानकांचे सक्तीने पालन करण्याचे आदेश दिले आहेत. नियामकांनी 1 जानेवारी 2020 पर्यंत परिक्षण आणि निरिक्षण प्रणाली स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. संशोधनात दूधाचे 6,432 नमुने गोळा केले, मे आणि ऑक्टोबर 2018 दरम्यान हे नमुने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 1,103 छोट्या आणि मोठ्या शहरातून गोळा करण्यात आले. हे नमुने संघटित आणि असंघटित दोन्ही क्षेत्रातून गोळा करण्यात आले होते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी