मोठा निर्णय ! राज्यात उद्यापासून कठोर निर्बंध पण Lockdown नाही; वॉईन शॉपबाबत घेण्यात आला ‘हा’ निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं यापुर्वीच कडक निर्बंध घातले आहेत. तरी देखील लोक ऐकत नव्हते. त्याच पार्श्वभुमीवर राज्यात लॉकडाऊन की आणखी कडक निर्बंध याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (रविवार) महत्वाची बैठक बोलावली होती. दरम्यान, बैठक संपली असून सध्यातरी राज्यात उद्यापासून कठोर निर्बंधची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सध्यातरी लॉकडाऊन लावण्यात येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या रात्रीपासून हे कठोर निर्बंध लावण्यात येणार आहेत.

प्ले ग्राऊंड, ग्राऊंड, सांस्कृतिक कार्यक्रम हे यावर बंदी घालण्यात आली आहे. सिनेमागृह, नाटयगृह हे देखील पुर्णपणे बंद असणार आहेत. रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान केवळ आणि केवळ अत्यावश्यक सेवाच्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील मॉल देखील बंद असणार आहेत. ज्या बस सुरू असणार त्यामध्ये स्टॅन्डींग प्रवाशांना बंदी असणार आहे. राज्यातील सर्व धार्मिकस्थळे उघडण्यासंदर्भात नियमावली असणार आहे.

दरम्यान, पुर्वीच्या नियमांनुसार वाईन शॉपची दुकाने सुरू राहणार आहेत. सीलबंद बॉटल विक्रीस परवागी असल्याचे मुंबईच्या पालकमंत्री शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. सार्वजनिक वाहतूक सुरू असणार आहे पण त्याबाबतची नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. रिक्षा आणि टॅक्सी या सुरू असतील पण अर्ध्या क्षमतेनुसार तसेच रात्रीच्या वेळी त्या बंद असणार आहेत. अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता इतर वाहनांना रात्रीच्या वेळी बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, कठोर निर्बंधाची नियमावली लवकरच ट्विटव्दारे जाहीर करण्यात येईल अशी माहिती मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री 8 पासून विकेंड सुरू होऊन तो सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत असेल. आहे की नाही याबाबत आगामी 1 तासात (रविवारी रात्री 7 वाजेपर्यंत) समजणार आहे. तासाभराच्या आत राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.