Big News : अखेर शाळेची घंटा वाजणार ! राज्यात इयत्ता 5 वी ते 8 वी चे वर्ग ‘या’ तारखेपासून सुरू होणार, शिक्षण मंत्री गायकवाड यांनी दिली मुख्यमंत्र्यांना माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – कोरोना व्हायरसचं संकट आल्यापासून आणि संपुर्ण देशभरात लॉकडाऊन लावण्यात आल्यानं इतके महिले बंद असलेल्या राज्यातील शाळा पुन्हा एकदा हहळूहळू सुरूहोत आहेत. यापुर्वी इयत्ता 9 वी, 10 वी आणि 12 वी चे क्लास सुरू करण्यात आले होते. आता राज्य सरकारनं इयत्ता 5 वी ते 8 वी पर्यंतचे वर्ग देखील सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात दि. 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील शाळा बंद आहेत. इयत्ता 5 वी ते इयत्ता 8 वी पर्यंतचे वर्ग दि. 27 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री गायकवाड यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीदरम्यान दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शाळा सुरू करताना शिक्षक तसेच विद्यार्थी यांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, शाळा सुरू करण्याबाबतचे अधिकारी हे स्थानिक प्रशासनाला देण्यात आले असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.