Satara News : सातार्‍यातील राजकारण तापलं ! राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपा आमदाराला मोठी ‘ऑफर’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीआधी साताऱ्यात भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात वाद निर्माण झाला होता या दोघातील वाद थाबण्याचे काही नाव घेत नाही. शिवेंद्रराजेनी तर वाटेला जाणाऱ्यांची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा धमकी वजा इशारा शशिकांत शिंदे यांना दिला होता. या प्रकारामुळे जिल्ह्यातील राजकारण तापले असून शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना पक्षात येण्याची ऑफर देत शशिकांत शिंदे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, सातारा नागपालिका निवडणुकीपूर्वी शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादीत आले तर तेच पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनेलचे नेतृत्व करतील. उरला प्रश्न तो जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा. इथे कधीही राजकारण येऊ दिले नाही. त्यामुळे रामराजे नाईक निबाळकर यांच्या माध्यमातून सगळेजण एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करतील असं त्यांनी सांगितले. मात्र, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र ज्या ठिकाणी विरोध होईल, तिथे ताकदीने निवडणूक लढली जाईल असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला.

पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या मी सुरुवातीपासून पार पडत आलो आहे. जावळी, कोरेगाव हे दोन्ही तालुके माझ्यासाठी जवळचे आहेत. या तालुक्यात जर कोणी एकत्र येऊन पक्षवाढीसाठी काम करत असेल तर मला देखील पक्षवाढीसाठी आणि पक्षाला फायदा होण्यासाठी प्रयत्न करायला नकोत काय? असा सवाल करत याचा जर कोणाला त्रास होत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. असेही शिंदे म्हणाले.

शिंदे म्हणाले, पक्षने मला मोठी जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु आहे. पक्षाची ताकद टिकवून ठेवायची असेल तर मला काम करावं लागेलच. त्याचा जर कोणाला त्रास होत असेल तर त्याला मी काही करू शकणार नाही. शिवेंद्रसिंहराजेच काय माझा कुठल्याही नेत्याशी वैयक्तिक वाद नाही. पण पक्षाने दिलेली जबाबदारी पार पडायची आहे. कोणा वाईट वाटते म्हणून पंचायत समिती, जिल्हा परिषद सोडायची का? काही दिवसांनी विधानपरिषद, डीपीडीसीची निवडणूक लागेल, राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आल्या तरच या निवडणुकांमध्ये फायदा होणार असल्याचे सांगत जिल्हा बँकेला जावळी सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

काय आहे शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यातील वाद?
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीआधी साताऱ्यात एक सभा झाली होती. त्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांचे न घेता गम्भीर इशारा दिला होता. ते म्हणाले, सातारा तालुक्यातील संघर्ष टाळण्यासाठी आम्ही भाऊ एकत्र आलो. पण हे काही जणांना रुचत नाही त्यामुळे हीच मंडळी माझ्या आणि उदयनराजे यांच्या कानाला लागून आमच्यात वाद निर्मम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मी देखील भाऊसाहेब महाराजांचा मुलगा आहे, हे त्यांनी विसरू नये. ज्या उदयनराजेंना लोक घाबरतात, त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून मी निवडून आलेला आहे. मी कुणालाही घाबरत नाही. मी संपलो तरी चालेल पण माझ्या वाकड्यात शिरणाऱ्यांना मी संपवल्याशिवाय राहणार नाही असा गंभीर इशाराच शशिकांत शिंदे यांना नाव न घेता दिला होता. त्यावर शशिकांत शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, माझा जिल्ह्यातील शिवेंद्रराजेसह अन्य कोणत्याही नेत्याशी कसलाही वाद नाही. कर्यकर्त्याशी जर मी भेट असेल तर त्याचा कोणाला त्रास होण्याची गरज नाही. वास्तविक पक्षश्रेष्ठींनी सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सूचना केलेली असताना देखील मी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. माझ्या मनात जर खोट असती तर मी सातारा जावळी इथूनच लढलो असतो. आगामी काळामध्ये पक्षवाढीसाठी संघर्ष अटळ आहे. पक्षासासाठी मला संघर्ष करावाच लागणार असल्याचेही त्यांनी म्हंटल होत.