निरव मोदीपेक्षा बिटकॉइन एक्सचेंजचा मोठा घोटाळा उघडकीस 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आता नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बिटकॉइन एक्सेंजच्या माध्यमातून देशात  सुमारे १८ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे .

 [amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b563633a-cd2a-11e8-b479-3d4bcc820d67′]

अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी फर्म असलेल्या सायफर ट्रेसने केलेल्या दाव्यानुसार क्रिप्टोकरंसी एक्सेंजरांनी २००९ पासून सुमारे १८  हजार कोटी रुपये मूल्याच्या बिटकॉइनचे लाँड्रिंग केले आहे.  हे क्रिप्टो करंजी एक्सचेंजर्स भारताबाहेर असून, जे भारतातून मनी लाँड्रिंग करत आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवणार कुठलाही मनी लाँड्रिंग कायदा अस्तित्वात नाही.

[amazon_link asins=’B015KHN37E,B06WP5SXNM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c7472881-cd2a-11e8-b5d2-7b4927568b04′]

२०१८ च्या सुरुवातीच्या ९ महिन्यांमध्ये हॅकिंग एक्सचेंजच्या माध्यमातून ९२  कोटी ७० लाख डॉलर म्हणजेच सुमारे ६८ अब्ज रुपये  मूल्याच्या व्हर्चुअल करंसीची चोरी झाली होती. ही चोरी गेल्या वर्षीच्या तुलनेत २५० टक्क्यांनी अधिक होती.

सायफर ट्रेसने आघाडीच्या २० क्रिप्टोकरंसी एक्सचेंजच्या माध्यमातून झालेल्या तब्बल ३५ कोटी व्यवहारांची पडताळणी केली. तसेच त्यापैकी दहा कोटी व्यवहारांची दुसऱ्या पक्षांशी जुळवणूक करून पाहिली. या एक्सचेंजचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी करण्यात आलेल्या २ लाख ३६ हजार ९७९ बिटकॉइन्सच्या वापरासाठी झाला होता. सायफर ट्रेसने मनी लाँड्रिंगशिवाय हॅकिंग आणि क्रिप्टोकरंसीच्या चोरीचाही शोध लावला आहे. वरील १८ हजार कोटींच्या व्यवहारांमध्ये सायफर ट्रेसने नजर ठेवलेल्या आपराधिक आणि अतिशय संशयास्पद व्यवहारांचाच समावेश आहे.

बिटकॉइनविषयी – 

२००९ साली पहिल्या बिटकॉइनच्या निर्मितीपासून झाली तेव्हापासून त्याचा आभासी जगात प्रवास चालू आहे.  लॉगइन आणि अत्यंत किचकट पण गुप्त अशा पासवर्डच्या आधारे बिटकॉइन्सचे सारे व्यवहार चालतात. त्यामुळे नेमकी कोणती व्यक्ती बिटकॉइन्स होल्डर आहे हे कळणे अवघड आहे. बिटकॉइन्स होल्डर हा जगाच्या पाठीवरून कोठूनही व्यवहार करीत असला तरी त्याचा आयपी अ‍ॅड्रेस सोडला तर इतर कोणतीच माहिती मिळत नाही.

[amazon_link asins=’B01LX3A7CC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c83a5764-cd29-11e8-8544-451d9dc469b9′]

 बिटकॉइन्सचा प्रोग्राम पारदर्शी आहे, त्याद्वारे फसवणूक होण्याचा संभव नाही, असा जरी बिटकॉइन संबंधितांकडून दावा केला जात असला तरी आज जगातील कोणत्याही बिटकॉइन्सधारकाची प्रचलित व्यवस्थेतील अधिकृत ओळख पटवून देणारी सोय या यंत्रणेत नाही.
भारतामध्ये रिसर्व्ह बँकेने स्पष्ट केल्यानुसार , बिटकॉइन हे अधिकृत चलन नाही तसेच  बँकेकडून बिटकॉइन्स व तत्सम आभासी चलनाच्या माध्यमातून केले जाणारे व्यवहार हे मध्यवर्ती बँकेने अथवा मॉनिटरी ऑथॉरिटीने प्रमाणित केलेले नाहीत. तसेच हे व्यवहार करण्यासाठी कोणतेही नियामक, पूर्वपरवानगी, नोंदणी अथवा प्रमाणीकरण नाही.