बिग बॉस 13 : कोयनाशी जोरदार भांडण केलं आरतीनं, सलमान खानच्या सूचनेचा झाला परिणाम ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बिग बॉस 13 ला धमाकेदार सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात काही स्पर्धकांनी घरात कनेक्शन बनवण्याचा आणि भांडणाचा प्रयत्न करून चांगलीच प्रसिद्धी मिळवला. तर काही स्पर्धक केवळ बॅग्राऊंडमध्ये थांबले होते. वॉर भागामध्ये सलमान खानने आठवड्यात घडलेल्या घटनांबद्दल प्रत्येकाला आपले मत विचारले. सलमानने स्पर्धक असलेल्या आरती सिंहला स्वतःबद्दल प्रेक्षकांना माहिती देण्यास संगितली.

शोच्या पुढील भागात आरतीला कोयना मित्राच्या काही गोष्टी आवडत नाही म्हणून आरती तीच्याशी भांडते आणि तिला म्हणते, तुमचे सिद्धार्थ डे सोबत एवढे भांडण झाले, तुमचे त्याबद्दल एवढे स्ट्रॉंग मत होते मात्र तुमच्यात अचानक सगळे ठीक झाले कारण त्या दिवशी नॉमीनेशन्स होते.

आरती रागात कोयनाला म्हणते की, सुरुवातीला त्यांनी एवढी वूमेन पॉवर दाखवली आणि अचानक आपले मत बदलले. आरतीला वाटत आहे की कोयना आधी सगळ्यांशी भांडते मात्र नॉमिनेशनची वेळ आली की सगळ्यांशी नीट बोलते. नॉमिनेशन बाबतीत आरती आणि कोयनामध्ये खूप भांडण झाले आहे.

सलमान खानने स्पर्धकांना आपले मत मांडायला लावल्यानंतर सर्वजण मोकळेपणाने आपले मत सगळ्यांसमोर बोलून दाखवू लागले. मागील भागामध्ये रश्मी देसाई आणि देओलीना ने घरच्यांसोबत भांडण केल्यानंतर सिद्धार्थ शुक्लाला हे बोलताना ऐकले की, आता प्रत्येक जण प्रसिद्ध होण्यासाठी आणि फुटेज खाण्यासाठी बळच भांडण करू लागला आहे. आता पुढील भागात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की स्पर्धक आपापसात कोणत्या प्रकारचे नाते निर्माण करतात.

Visit : Policenama.com

You might also like