Bigg Boss 13 : Male आणि Female कंटेस्टेंट एकाच बेडवर ! BJP नेत्यासह लोक सलमानला म्हणाले- ‘बंद कर हा शो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉसला घेऊन वाद होणं यात काही नवीन गोष्ट नाही. या शोमधील अश्लीलतेवर याआधाही प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या शोचा टाईमही बदलला आहे. नुकताच शो रंगत होता परंतु अशात पुन्हा वदाला सुरुवात झाली आहे. हा शो अश्लीलता पसरवणारा शो असल्याचं म्हटलं जात आहे. हा शो बंद करण्यासाठीही मागणी केली जाताना दिसत आहे.

https://twitter.com/Saumya_namo/status/1180649013697138688

सध्या ट्विटरवर #UnsubscribeColoursTV, #Boycott_BigBoss, #JehadFelataBigBoss असे अनेक हॅशटॅगही ट्रेंड करताना दिसत आहेत. काही युजर्स तर ब्लॅक स्क्रिनशॉट सोबत आपला विरोध दर्शवत आहेत.

https://twitter.com/Krantikari108/status/1180536875435597824

सामान्यांसह भाजप नेते सत्यदेव पचौरी यांनीही बिग बॉसबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “हा शो नाही तर अय्याशीचा अड्डा बनला आहे. यामुळे समाजात घाण पसरत आहे. हा शो ताबडतोब बंद व्हायला हवा.” अशा प्रकारच्या सर्व पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

 

Visit : Policenama.com