Video : Sonali Phogat नं लाल साडीत लावला नखरेदार ठुमका, Arshi Khan ला राहवलं नाही, कमेंट करत म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sonali Phogat Viral Dance Video बिग बोस १४ पासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांच्या नवीन व्हिडिओद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या सोनाली बऱ्याचदा चर्चेत असतात. सोनालीने पुन्हा एकदा त्यांचा डान्स व्हिडीओ शेयर केला आहे, जो लोकांना खूप आवडला आहे. या व्हिडिओतील नखरेदार ठुमक्यांनी प्रत्येकाचे मन जिंकून गेले आहे. Sonali Phogat यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यामध्ये त्या लाल साडी नेसून धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत.

डान्ससोबत त्यांनी दिलेल्या एक्स्प्रेशनमुळे लोकांची झोप उडाली आहे. या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. या लिस्टमध्ये बिग बॉस १४ फेम अर्शी खान यांचाही समावेश आहे. अर्शी यांनी या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, ‘अरे वाह ! क्या बात.’

सोनाली यांचा हा व्हिडीओ जलद गतीने व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ आतापर्यंत ७६ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या आधीही सोनाली यांनी आपल्या ठुमक्याने खळबळ उडवली होती. बिग बॉस १४ मध्ये सोनाली यांच्या आदाकारीला लोकांनी पसंती दिली होती.