Bigg Boss 14 Grand Finale : रुबीना दिलैक बनली ‘शो’ची विनर, राहुलला पराभूत करून ट्रॉफी पटकावली

मुंबई : बिग बॉसच्या फन्सला ज्याची प्रतिक्षा होती तो क्षण अखेर आला. बिग बॉस 14च्या या सीझनच्या विजेत्याची घोषणा झाली आहे आणि रुबीना दिलैक या सीझनची विजेती ठरली आहे. रुबीना शोच्या सुरूवातीपासूनच खुप स्ट्राँग वाटत होती. शोमध्ये रुबीनाने पती अभिनव शुक्लाच्या सोबत एंट्री केली होती. अनेक पोल्समध्ये रुबीनाला अगोदरपासूनच या सीझनची विजेती ठरवले गेले होते.

रुबीनाच्या विजयाने तिचा पती अभिनव शुक्ला खुप आनंदी झाला. रुबीनाच्या विजयावर तिच्यापेक्षा तो जास्त आनंदी दिसत होता. रुबीनाकडे देशाची सून म्हणून पाहिले जाते. शोच्या चौथ्या आठवड्यातच तिने ही गोष्ट सर्वांसमोर ठेवली की तिला आपल्या पतीला घटस्फोट द्यायचा आहे. ज्यामुळे शो आणखीच खास झाला.

रुबीनाने हा खेळ आपला पती अभिनव शुक्लाच्या सोबत खेळला आणि दोघांमध्ये या घरात खुप प्रेम दिसून आले. याच कारणामुळे आता या जोडीचा घटस्फोट होणार नाही. याचाच अर्थ रुबीनाने आपल्या वैयक्तिक जीवनासह बिग बॉसचा गेम जिंकला आहे.

कमी मिळाली अमाऊंट
ट्रॉफीसह रुबीनाला प्राईज मनी मिळाले. यावेळी ‘बिग बॉस 14 च्या विनरसाठी 50 लाख रुपयांचे प्राईज मनी ठेवण्यात आले आहे, परंतु जिंकणार्‍याला केवळ 36 लाखच मिळतील कारण राखी सावंतने फिनाले वीकमध्ये एंट्री मिळवण्यासाठी या रक्कमेपैकी 14 लाख रुपये घेतले होते.