Bigg Boss Marathi 2 : आस्ताद काळेने माधव देवचकेसाठी लिहली ‘अशी’ पोस्ट की

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून या शोकडे पाहिले जाते. या पर्वात अनेक लोकप्रिय कलाकरांचे चेहरे पाहायला मिळत आहेत. हे पर्व पहिल्या दिवसापासूनच रंजक वळणावर जात आहे.

याकेड सर्वांचेच लक्ष लागून राहिल्याचे दिसत आहे यात पहिल्या पर्वातील स्पर्धकांचाही समावेश आहे. नुकतीच ही बाब सिद्ध झाल्याचेही दिसत आहे. पहिल्या पर्वातील आस्ताद काळेने दुसऱ्या पर्वातील माधव देवचके याला पत्र लिहिले आहे. सोशल मीडियावर लिहिलेल्या या पत्रातून त्याने आपल्या भावना मांडल्या आहेत.

आस्तादने इंस्टाग्रामवर माधवसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने खास कॅप्शनही दिले आहे. आपल्या कॅप्शनमध्ये आस्ताद म्हणतो की, “हा असाच आहे. आयुष्यातल्या अनेक गोष्टींची कमाल क्लॅरिटी आहे याला. जीवाला जीव लावतो. म्हणून जवळच्यांचं काही चुकलं तर हक्काने ओरडतोसुद्धा. सर्वांचा लाडका कान्हा… आमचा लाडका माध्या, मॅडी… भीड गड्या…” असे म्हणत आस्ताने माधवचे कौतुक केले आहे.

याबाबत बोलताना आस्ताद म्हणतो की, “मालिकेमुळेच माझे माधवसोबत जीवनभरासाठी ऋणानुबंध जुळले आहेत. तो मला सख्ख्या भावासारखा आहे. माधव हा उत्तम क्रिकेटरही आहे त्यामुळे त्याच्यात स्पोर्टमनचे स्पिरीट आहे. त्यामुळे तो टास्कमध्येही चांगला खेळेल असा मला विश्वास आहे.”

तुम्हाला सांगू इच्छितो की, ” सरस्वती या मालिके आस्ताद आणि माधव एकत्र दिसले होते. या मालिकेत आस्ताद काळेने राघव ही भूमिका साकारली होती तर माधव देवचकेने या मालिकेत आस्तादच्या लहान भावाची म्हणजे कान्हाची भूमिका साकारली होती.

यावेळीच त्यांची चांगली मैत्री झाली. मालिकेत जसं राघव- कान्हाचं एकमेकांप्रती प्रेम होतं तसंच दोघांच्या मैत्रीतही प्रेम दिसत आहे. आस्तादच्या माधवसाठीच्या या पोस्टवरून त्याचे प्रेमही दिसून येते.

You might also like