नेहा पेंडसेने इंस्टाग्रामवरून टाकलेल्या ‘त्या’ फोटो मुळे फॅन्सला आश्चर्याचा धक्का

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिग बॉस सिझन १२ मधील नेहा पेंडसेच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. नेहा आपल्या सोशल अकाउंटवरून अनेक स्टाईलिश फोटो शेअर करत असते. नुकताच नेहाने एका व्यक्तीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे आणि हार्टचं चिन्ह टाकलं आहे. हा फोटो इटलीत काढण्यात आला आहे. या फोटोत तिच्या बोटात रिंग पहायला मिळते आहे. तिच्यासोबत असलेला हा व्यक्ती कोण आहे याबाबत सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते.

नेहाने त्या व्यक्ती बाबत खुलासा केला आहे, एका सिनेमा मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हंटले आहे होय यांनी मला प्रपोझ केले आणि लवकरच आमचा साखरपुडा होईल. नेहा ने आपल्या इन्स्टा अकाउंट वर ज्या व्यक्तीसोबत फोटो टाकले आहेत त्या व्यक्तीचे नाव शार्दुल सिंह आहे आणि त्या व्यक्तीने सुद्धा आपल्या अकाउंट वर नेहाचे फोटो शेअर केल्ले आहेत व त्याला कॅप्शन दिले आहे ‘हॅप्पिली इन लव्ह’

नेहा पेंडसे ने तमिल, तेलुगू आणि मलयालम चित्रपटाव्यतिरिक्त मराठी चित्रपटामध्ये सुद्धा काम केले आहे आणि बॉलीवुड मध्ये प्यार कोई खेल नहीं, दाग: द फायर, दीवाने सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like