Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात होणार तुफान राडा!

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बिग बॉस (Bigg Boss Marathi 4) चा प्रत्येक सीजन हा चर्चेचा विषय असतो. यंदाचा बिग बॉस सीजन 4 देखील जोरात सुरु आहे. कधी भांडण कधी वाद यांनी रंगलेला बिग बॉस 4 (Bigg Boss Marathi 4) देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. हळूहळू स्पर्धकांचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर येत आहे. गेल्याच आठवड्यात योगेश जाधव (Yogesh Jadhav) बाहेर पडताच त्यांनी किरण मानेंवर (Kiran Mane) निशाणा साधला होता. यावरून घरात जोरदार वाद पाहायला मिळाले. यानंतर आता ‘खुला करायचा राडा’ (Khula Karaycha Rada) हे कार्य सदस्यांना सोपवण्यात आले होते. त्याचाच प्रोमो सध्या जोरात वायरल होत आहे.

 

समोर आलेल्या प्रोमो मध्ये दिसत आहे की, खुला करायचा राडा या कार्यामध्ये सदस्य मिरचीची धुरी, पाणी, तेल या सगळ्याचा वापर करताना दिसत आहेत. या टास्कमध्ये आज घरात तेजस्विनी (Tejaswini) आणि अमृता धोंगडे (Amrita Dhongde) नवी खेळी करताना दिसणार आहेत. टास्कसाठी दोन्ही टीम आपापल्या रणनीती आखत आहेत.

 

आता या कार्यानंतर कोणता नवीन वाद निर्माण होईल, कोणती टीम हे कार्य जिंकेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
तर त्याचबरोबर वाइल्ड कार्ड एंट्री (Wild card entry) म्हणून स्नेहलता वसईकर (Snehalata Vasaikar)
यांची खेळी पाहण्यास देखील प्रेक्षकांना खूपच मज्जा येणार आहे हे मात्र नक्की.

 

Web Title :- Bigg Boss Marathi 4 | bigg boss marathi todays episode video viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | येणार्‍या जाणार्‍यांना लुटणार्‍या सराईत गुन्हेगाराला तरुणाने दिले पकडून; कोंढव्यातील घटना

Aishwarya Rai | करीनाच्या कृपेनेच ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमानची एन्ट्री…

Lok Sabha Election 2024 | लोकसभेसाठी भाजपचे मिशन 45! शिवसेना-राष्ट्रवादीचे बालेकिल्ले निशाण्यावर