Lok Sabha Election 2024 | लोकसभेसाठी भाजपचे मिशन 45! शिवसेना-राष्ट्रवादीचे बालेकिल्ले निशाण्यावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपने (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) आतापासूनच तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 45 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. यापार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) आढावा घेण्यासाठी भाजपची आज दुपारी बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यासह लोकसभा निवडणुकीची जबाबदारी असलेल्या सर्व संघटन मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असून त्यांच्यासोबत चर्चा होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर भाजपने मिशन 45 अभियान आधीपासूनच सुरु केले आहे. या अभियानाचा आढावा घेण्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दुपारी भाजप प्रदेश कार्यालयात (BJP State Office) ही बैठक होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने किमान 45 जागा जिंकवण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे.

भाजपच्या मिशन 45 मध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेकडे (Shivsena) असलेल्या
मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघातील तयारीचा आढावा आणि येणाऱ्या काळातील योजना यासाठी
उद्या विभागीय संघटन मंत्री लोकसभा प्रवासाची जबाबदारी असेले प्रमुख नेते यांची बैठक होणार आहे.
यापूर्वी भाजप कोअर कमिटी (BJP Core Committee) आणि सर्व मंत्र्यांची आज रात्री 8 वाजता महत्त्वाची बैठक
होणार आहे.

या बैठकीला विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यासह देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis),
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), राधाकृष्ण विखे-पाटील
(Radhakrishna Vikhe-Patil), गिरीश महाजन (Girish Mahajan), रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan),
आशिष शेलार (Ashish Shelar), प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार
आहेत.

Web Title :-  Lok Sabha Election 2024 | bjp eyeing 45 seats for lok sabha elections shivsena and ncp constituency on target

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bharat Jodo Yatra | काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील बड्या नेत्याला धक्काबुक्की, चेहऱ्याचा भाग फॅक्चर

IND Vs BAN Weather Report | एडिलेडमध्ये भारत वि. बांग्लादेश मॅच होणार? कसं असेल आजचे हवामान