Bihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच सोडली पतीची साथ, आता साकार करणार स्वप्न

भागलपुर : वृत्तसंस्था –  Bihar |सुल्तानगंज विभागातील (Sultanganj Division) एका गावात ग्राम पंचायतीकडून एक वेगळा निर्णय सुनावण्यात आला. पंच आणि सरपंचांनी एक प्रकरण ऐकल्यानंतर दिड महिन्यापूर्वी विवाह झालेल्या मुलीला तिला पतीपासून वेगळे होण्याचे फरमान सुनावले आहे. कारण मुलीला शिकायचे होते, परंतु मुलगा नकार देत होता. यानंतर ‘बेटी पढे, बेटी बढे’ लक्षात घेऊन पंचांनी हा निर्णय घेतला की, दोन्ही बाजू आपल्या स्वखुशीने वेगळ्या होतील. ग्राम कचेरीच्या सभेत मुलगा आणि मुलीचे कुटुंबिय सुनावणीवेळी हजर होते. Bihar | neha wanted to study after marriage so she left her husband in 45 days now her dreams will come true

वडीलांनी केली होती अपहरणाची तक्रार

दिड महिन्यापूर्वी घोरघट येथील रहिवाशी सीताराम पंडित यांचा मुलगा सुनील आणि जहांगीरा येथील रहिवाशी गुरुदेव पंडित यांची मुलगी नेहा कुमारी यांचा हिंदू पद्धतीने विवाह झाला होता.
विवाहानंतर नेहा गायब झाली. तिचा पती सुनीलने भरपूर शोध घेतला पण ती सापडली नाही.
यानंतर मुलीच्या वडीलांनी सुल्तानगंज पोलीस (Sultanganj Police) ठाण्यात अर्ज देऊन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार केली. जेव्हा नेहाला याबाबत समजले तेव्हा ती घरी पोहचली.

 

घर सोडून पळालेल्या मुलीने ग्राम पंचायतमध्ये सांगितले…

घरी आल्यानंतर नेहाने सांगितले की, तिचे अपहरण झालेले नाही.
तर ती शिकण्यासाठी पाटणा येथे गेली होती. नेहाने वडिलांना सांगितले की,
सासरच्यांना तिला शिकवायचे नव्हते. म्हणून हे पाऊल उचलले.
नंतर प्रकरण ग्राम पंचायतीकडे गेले.
विवाहानंतर सासरी गेल्यावर पती छळ करू लागला.
तिला आपल्या करियरची चिंता सतावत होती. यानंतर ती संधी पाहून पळून गेली होती.

सरपंचाने सांगितले की, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व लोकांचे म्हणणे होते की, घर वाचावे परंतु असे झाले नाही.
दोन्ही बाजू आता आपल्या स्वखुशीने वेगळ्या राहतील.
ग्राम कचेरीच्या निर्णयानंतर दोघे स्वतंत्र होऊन जीवन जगतील.
मुलगी आपले शिक्षण सुरूठेवेल आणि करियरबाबत विचार करेल.

 

Web Title : Bihar | neha wanted to study after marriage so she left her husband in 45 days now her dreams will come true

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Unlock | राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी, पुण्यासह 11 जिल्ह्यांत निर्बंध कायम

Amarjeet Sinha Resign | PMO कार्यालयातील आणखी एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्याचा राजीनामा

Maharashtra HSC Result | अखेर विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली ; 12 वीचा निकाल उद्याच जाहीर होणार