अवैधरित्या गावठी दारू बनविणाऱ्या डझनभर भट्ट्या नष्ट

पोलीसनामा ऑनलाईन : बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील पोलिसांनी बुधवारी अधौरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पर्वतीय भागात दुर्गावती नदीच्या काठावर मोहापासून दारू बनविणाऱ्या डझनभर भट्ट्या नष्ट केल्या. त्याचवेळी पोलिसांनी घटनास्थळी एका व्यावसायिकाला अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून रेशनचे वितरण करणाऱ्या डिलरच्या घरी छापा टाकण्यात आला.

छापा टाकण्याच्या वेळी पोलिसांनी रेशन डीलरच्या घरातून मोहची 60 पोती जप्त केली. अवैध दारूच्या व्यवसायात त्याचा सहभाग असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली व दोघांनाही तुरूंगात पाठविले.

यासंदर्भात माहिती देताना कैमूर एसपी दिलनवाज अहमद यांनी सांगितले की, अढौरा पोलिस स्टेशन परिसरातील डोंगराळ भागात दुर्गावती नदीच्या काठावर मोहापासून बेकायदा मद्यनिर्मितीचा व्यवसाय सुरू होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत डझनभर भट्ट्या नष्ट केल्या. त्याचवेळी पोलिसांनी रेशन वितरण करणार्‍या डीलरच्या घरावर छापा टाकला असता देशी दारू तयार करण्यासाठी वापरली जाणारी मोहची 60 पोती जप्त केली.