तेजप्रताप यादव आणि ऐश्वर्या रॉयचा घटस्फोट ?

पटना : वृत्तसंस्था – एक मोठी बातमी समोर आली आहे. आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव आपली पत्नी ऐश्वर्या रॉयशी घटस्फोट घेणार असल्याचे समजत आहे. विशेष म्हणजे यासाठी त्याने कौटुंबिक न्यायालयात अर्ज देखील सादर केला आहे. तेजप्रताप आणि ऐश्वर्या गेल्या चार महिन्यांपासून एकत्र राहत नसल्याचे वृत्त सुत्रांनी दिले आहे. इतकेच नाही तर ऐश्वर्या आपले वडिल चंद्रिका रॉय यांच्यासोबत राबडी देवी यांच्या घरी पोहोचली तर दुसरीकडे तेजप्रताप लालूंच्या भेटीसाठी रांची रवाना झाले आहेत.

जाहिरात

घटस्फोटासाठी अर्ज

लालुंचा मोठा मुलगा तेजप्रताप आणि चंद्रिका रॉय यांची मुलगी ऐश्वर्या यांच 5 महिन्यांपूर्वीचं लग्न झालं होतं. परंतु तेजप्रताप आणि ऐश्वर्यामध्ये लग्नानंतर भांडण सुरू  झालं असं सांगण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे या सततच्या भांडणांमुळे त्याने ऐश्वर्यासोबत न राहण्याचा निर्णय घेतल्याचेही समजत आहे. तेजप्रतापने यासाठी  पटनाच्या नागरी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलायं. 12 मे ला पटनामध्ये धुमधडाक्यात त्यांचं लग्न झालं होतं. यावेळी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. या लग्नासाठी लालूंना पॅरोल देखील देण्यात आला होता. महत्त्वाची बाब अशी  की, ऐश्वर्या राजकारणात येणार असल्याच्या बातम्याही काही दिवसांपूर्वी आल्या होत्या.

जाहिरात

अॅमेझॉनवरुन मागवले स्पीकर आणि अालं असलं काही…
मुंबई : आॅनलाईन खरेदीमध्ये बऱ्याचदा फसवणुकीचे चान्सेस जास्त असतात. सदर फसवणुकीच्या अनेक घटना आपण ऐकल्याही असतील. अनेकदा ग्राहक मागवतो एक अन त्याच्या पदरात पडते भलतेच काही. अशीच काहीशी एक घटना समोर आली आहे.  दिवाळीनिमित्त ऑफर सिझन सुरु असल्याने गर्दीत न जाता घर बसल्या लोकांची ऑनलाईन शॉपिंग दणक्यात सुरु आहे. या महिलेने ७ हजार रुपये किंमतीचे जेबीएलचे स्पीकर्सच्या ऑनलाईन मागविले होते. मात्र त्याऐवजी तिला पार्सलमध्ये पणत्या आणि लाडू मिळाले आहेत. हे पार्सल पाहून मी गोंधळले आहे. मला समजत नाही की मी आधी लाडू खाऊ की आधी दिवे लावू, अशा शब्दांत तिने अॅमेझॉनकडे याची ट्विटरवरून तक्रार केली आहे.  अॅमेझॉननेही तिच्या तक्रारीची दखल घेत तिला यात योग्य चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे. अॅमेझॉन या प्रसिद्ध ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून महिलेने जेबीएल कंपनीचे स्पीकर्स ऑर्डर केले होते. यासाठी तिने ७ हजार रुपयेही भरले होते. मात्र, जेव्हा घरी आलेलं स्पीकरचं पार्सल तिने उघडून पाहिलं आणि तिला धक्काच बसला. त्यात स्पीकरऐवजी दोन पणत्या आणि लाडू होते. ते पाहून त्या महिलेने ट्वीट करून अॅमेझॉनला तक्रार केली.